/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> महामार्गाच्या कामासाठी संपादित झालेल्या जमीन बाधित शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही आ. राणाजगतसिंग पाटील

Hot Posts

महामार्गाच्या कामासाठी संपादित झालेल्या जमीन बाधित शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही आ. राणाजगतसिंग पाटील


धाराशिव: नळदुर्ग- अक्कलकोट महामार्गाच्या कामासाठी संपादित जमिनी बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मावेजा संबंधित शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. बाधित शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगतसिंग पाटील यांनी मंगळवारी दि,28 रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास दिली.

आमदार राणाजगतसिंग पाटील यांनी नळदुर्ग - अक्कलकोट(652) महामार्गाच्या कामासाठी संपादित झालेल्या जमिनी संदर्भात संबंधित अधिकारी व संबंधित बाधित शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मावेजा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. जमिनीच्या मावेजासाठी सुरू केलेला लढा न्याय्य आहे. सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे उच्च न्यायालयाकडून शेतकऱ्यांना योग्य नाही मिळेलच त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू विचारात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना आ. पाटील यांनी दिल्या. तसेच बाधित शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही असे शेतकऱ्यांना आ.पाटील यांनी आश्वासित केले.

यावेळी जिल्हा अधीक्षक भुमीअभिलेख  कार्यालयाचे तुळजापूर तालुका उपाधीक्षक नितीन वाडकर, राष्ट्रीय महामार्ग सोलापूरचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी राजगुरू, शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, कार्याध्यक्ष सरदार सिंग ठाकूर, बाधित शेतकरी व्यंकट पाटील, दिलीप पाटील, विक्रम निकम, खंडू हलकंबे, रहेमान शेख, सुशांत भूमकर आदी उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments