Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडून पाहणी | Dharashiv zilyat zalelya awkali paus ,garpitine zalelya nuksanichi mukhymantri,palakmantri yancyakadun pahni

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडून पाहणी | Dharashiv zilyat zalelya awkali paus ,garpitine zalelya nuksanichi mukhymantri,palakmantri yancyakadun pahni

तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील  नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी


धाराशिव :मागील आठवड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून त्याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
धाराशिव जिल्ह्यात दि, ८ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाडी बामणी (ता. उस्मानाबाद), तुळजापूर तालुक्यातील मोर्डा  येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, माजी खासदार रवी गायकवाड, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा, येथे शेतकऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील श्रीमती सीताबाई उत्तम सुरवसे आणि उत्तम सुरवसे या शेतकरी दाम्पत्याच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. दोन एकर क्षेत्रावरील द्राक्ष बाग वादळी पावसाने भुईसपाट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरवसे दांपत्याची आपुलकीने विचारपूस केली. त्यांना धीर दिला. राज्य शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुरवसे दाम्पत्याला कोणकोणत्या बँकांची किती कर्जे आहेत, याची विचारणा केली. सुरवसे यांच्या भुईसपाट झालेल्या द्राक्ष बागेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आतमध्ये जावून नुकसानीची पाहणी केली.

धाराशिव तालुक्यातील वाडीबामणी येथील शेतकऱ्यांशी संवाद

धाराशिव तालुक्यातील वाडीबामणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद 



धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील बाबासाहेब उंबरदंड आणि श्रीमती साधना उंबरदंड या शेतकरी दाम्पत्याच्या कलिंगड आणि ड्रॅगन फ्रुट बागेच्या नुकसानीची पाहणी केली.

Post a Comment

0 Comments