तुळजापुर: मागील काही दिवसापासून जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत आहे, हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तिवला होता ,शनिवारी दि ,८ रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील सिताबाई सुरवसे, तानाजी सुरवसे, शिवाजी सुरवसे यांची दोन एकर द्राक्ष बाग जमिनदोस्त झाली आहे. सुरवसे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने दखल घेऊन मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.
![]() |
श्री सुरवसे यांचे दोन एकर द्राक्ष बागेचे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान |
0 Comments