Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे चार वर्षीय चिमुरडीचा सर्पदंशांने मृत्यू |Four-year-old girl died of snakebite

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे चार वर्षीय  चिमुरडीचा सर्पदंशांने मृत्यू |Four-year-old girl died of snakebite


तुळजापुर : तालुक्यातील काटी येथील चार वर्षीय चिमुरडीचा सर्पदर्शांनी मृत्यू झाला, ही दुर्घटना तुळजापूर तालुक्यातील काटी (kati) शिवारात दि,११ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की काटी येथील शेतकरी श्री महादेव जानकर हे आपल्या कुटुंबासमवेत काटी -पांगदरवाडी रस्त्यावरील शेतात मागील सहा वर्षापासून वास्तव्यास राहत होते. त्यांची मुलगी रूपाली वय (४) वर्षे ही आई-वडिलांसोबत शेतात झोपली असताना अचानक विषारी सापाने घरात प्रवेश केला, झोपेमध्ये असताना रूपालीचा हात सापावर पडल्याने डाव्या हाताच्या मनगटास सापाने दंश केला. रूपाली हिने आपल्या आई-वडिलांना साप चावल्याचे सांगितले यावेळी तिथे सापाला शोधण्यासाठी वेळ वाया गेला. तोपर्यंत या चिमुर्डीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी तामलवाडी पोलीस ठाणे अंतर्गत काटी आऊट पोस्ट पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार जुबेर काजी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत रूपालीचे शवविच्छेदन करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments