उमरगा येथे उद्या खासदार जनता दरबाराचे आयोजन ओमप्रकाश राजेनिंबाळकर.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
धाराशिव : उमरगा येथे उदया दि. 22 जून 2023 रोजी नगरपरीषदेच्या अंतुबळी सभागृह, उमरगा येथे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणी व समस्या सोडवण्याठी सकाळी 11.00 जनता दरबार तसेच सोलापूर- उमरगा राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गच्या चालू कामाचा आढावा घेणे संदर्भात वेळ दुपारी 4.00 वा राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण सोलापूर चे प्रकल्प संचालक व संबंधित कंत्राटदार उपस्थित राहणार असून नागरिकांनी आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन उमरगा तालुक्यातील नागरिकांना करण्यात येत आहे.
0 Comments