Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्राथमिक शाळा व प्रशालेत योग दिन उत्साहात साजरा

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्राथमिक शाळा व प्रशालेत योग दिन उत्साहात साजरा

===============================


तुळजापुर दि.२१ : काटी.ता.तुळजापुर येथील जि.प.प्राथमिक शाळा व प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी सात वा.शाळेच्या मैदानात योग प्रात्यक्षिके  करण्यात आले.योगप्रशिक्षक पवार मॅडम यांनी योग प्रात्यक्षिके करुन घेण्यात आली.मुख्याध्यापक कोळी ,सत्यवान रसाळ ,सहशिक्षक पंकज काटकर,अजित इंगळे,कांबळे मॅडम,क्षिरसागर मॅडम,जाधव सर,भुमकर,नागेश भोसले,राहुल सुरवसे,हणुमंत कदम या शिक्षकांनी ही योग प्रात्यक्षिक केली.विद्यार्थ्यांनी उत्साहात योगाचा सराव केला. या योगप्रात्यक्षिकामध्ये लोकमंगल समूहाचे श्री सागर देशमुख व शिवाजी कुंभार यांनी योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला व योग सादरीकरण केले. योग प्रात्यक्षिकांमध्ये मयुरासन,गरुडासान,वज्रासन,नौकासान,कपालभाती,अनुलोम विलोम शवासन,सुखासन असे आसने घेण्यात आली.


Post a Comment

0 Comments