Hot Posts

6/recent/ticker-posts

यंदा खरीप हंगाम लांबीवर पडणार ? निम्मा जून उलटला तरी मान्सून सक्रिय नाही, बळीराजा हवालदिल

यंदा खरीप हंगाम लांबीवर पडणार ? निम्मा जून उलटला तरी मान्सून सक्रिय नाही, बळीराजा हवालदिल 


धाराशिव: निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात मागील काही वर्षापासून अतिवृष्टी , नापिकी पिकावरील विविध कीड रोग अशा विविध संकटात सापलेल्या बळीराजासमोर यंदा खरीप पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबीवर पडल्या आहेत, अद्याप कुठेही खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झालेली नाही, आणखी आठवडाभर पावसाने ओढ दिली तर यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र ही कोरडे जाण्याची शक्यता अधिक बळावली आहेे. परिणामी पावसा अभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

यंदा पावसाची चाहूल लावणारे रोहिणी नक्षत्र कोरडे गेले, मृग नक्षत्र लागून तब्बल पंधरा दिवसाचा कालावधी उलटूनही पावसाने हजेरी लावली नसल्याने खरीप हंगामातील मुख्यता जिल्ह्यात घेतले जाणारे पीक सोयाबीन, उडीद, तूर , मूग, बाजरी आधी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान यंदा वेधशाळेने मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता वर्तविल्यानेरा आद्रा नक्षत्रही  कोरडे जाणार का? या चिंतेने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे, त्यात पावसाळ्यात कडाक्याच्या उन्हासोबतच प्रचंड उघडावाल्याने नागरिक बेहाल झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली होती, मात्र मध्येच आलेल्या बिफर  जॉय या वादळामुळे मान्सूनला अनुकूलन वातावरण नसल्यामुळे मान्सून सक्रिय झाला नाही, पावसाच्या आगमनाचे  मृग नक्षत्र सुरू झाली तरी जिल्ह्याला पावसाची प्रतिक्षा आहे, पेरणीची घाई संकटात नाही असा निर्वाणीचा सल्ला कृषी क्षेत्रातील जुने जाणकार देत आहेत, तर खरीप महिनाभर लांबणीवर पडेल असा अंदाज शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेे.


यावर्षी वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता त्या अंदाजावरून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणी योग्य शेती केली, शेतकऱ्यांनी विविध कंपन्याचे सोयाबीन बियाणी बॅग, खुले बियाणे खरिपातील विविध बियाणांची खरेदी करून ठेवलेली आहे. तसेच विविध रासायनिक खताची सुद्धा खरेदी करून ठेवलेली आहे, रोहिणी नक्षत्र आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणी लांबीणीवर पडली आहेे, त्यामुळे निसर्ग शेतकरीयावर कोपला असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहेे.

शेतकऱ्यांची खरीप हंगामावर सर्व मदार असते, मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास पिकावर रोगराई कमी पडते आणि उत्पादन ही चांगली मिळते असा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने वेळेत पेरण्या होतील का? असा प्रश्न पडला आहे कारण 20 जून उजाडला तरी पावसाचे आगमन झाले नाही, केवळ दिवसभर सोसाट्याचा वारा आणि उन्हाचा कडाका निर्माण होऊन ऊन सावल्यांचा  खेळ सुरू असल्याने हळूहळू पेरणीची वेळ ही निघून जात आहे त्यामुळे शेतकरी चिंतातुर  झाले आहेत. 

गेल्या वर्षी सततच्या पावसाने नुकसान, यंदा पेरण्या लांबणीवर

यंदा वेळेत पाऊस झाला असता तर शेतकऱ्यांना गतवर्षी सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्याची संधी मिळाली असती, उशिरा पेरण्या झाल्या तर जिल्ह्यातील मुख्यता नगदी पिक पण ओळखले जाणारे सोयाबीन पिकाच्या उत्पादकीवर परिणाम होणार आहे, त्याचबरोबर तूर ,उडीद, मूग, बाजरी मका या पिकांनाही फटका बसणार आहे. शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या पिकाच्या वाणाचा वापर हा यंदा फायद्याचा राहणार आहे. सध्याचा काळ पेरण्यासाठी योग्य होता पण पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांना वाट पाहावीच लागणार आहे. गतवर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असल्याचे मत शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत.

उत्पादनाच्या दृष्टीने खरीप महत्त्वाचा

खरीप हंगाम हा शेतकऱ्याच्या अर्थकारणावर परिणाम करणारा घटक आहे त्यामुळे त्याची योग्य नियोजन झाली तरच उत्पादनात वाढ होणार आहे, जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सोयाबीन शेतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे, त्यामुळे वेळेवर पाऊस नाही झाला तर सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खते बियाणांची दुकानेही ग्राहकांच्या प्रतीक्षेत

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत, त्यात मागील हंगाम हातचे गेल्याने आर्थिक अडचणीत सापडला शेतकरी पैशाची जुळवाजुळव करताना दिसत आहे, त्यात पावसाने दगा दिल्याने, खते बियाणे आताच खरेदी करून काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे, परिणामी पेरणीसाठी लागणारे बियाणे खते खरेदीसाठी शेतकरी वेट अँड वॉच करीत आहेत. त्यामुळे महिनाभरापासून  गजबजलेली खते बियांणाची दुकाने ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत.

मान्सून लांबल्याने बाजारपेठेवर परिणाम

निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेती पिकाचा भरोसा राहिला नाही, त्यात शेती पिकांचे उत्पादन झाल्यास त्याला चांगला भाव मिळत काही, मग शेतकऱ्यांनी काय करायचे? आपला संसार चालवायचा कसा ? शेती पिकली नाही तर समाजाला अन्नधान्य कुठून मिळणार ? सरकारी शेतीमालाला योग्य हमीभाव देत नाही त्यामुळे आज शेतकरी खऱ्या अर्थाने आसमानी व सुलतानी संकटात सापडला आहे. पावसाने ओढ दिल्याने याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे, उलाढाल ही ठप्प होत आहेत त्यामुळे सध्या बाजारात मंदी जाणवत आहे. पिके चांगली आल्यास बाजारात मोठी उलाढाल होते, मात्र मागील महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकिट पाहायला मिळत आहे.



Post a Comment

0 Comments