उन्हाची तीव्रता असल्याने नातेपुते येथे वारकऱ्यांसाठी फिल्टरयुक्त पिण्याच्या पाण्याची सोय : मालोजीराजे देशमुख|
नातेपुते प्रतिनिधी : शुक्रवार दि २३ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होत असून नातेपुते येथे पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील पहिला मुक्काम होत आहे नगरपंचायतीच्या वतीने पालखी स्वागताची जयंत तयारी झाली आहे. सर्व कामे नेमून दिल्याप्रमाणे होत आहेत. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी मोठी विठ्ठल मूर्ती बनवण्यात आली आहे. यावर्षी पाऊस न पडल्याने पालखी सोहळ्यात उन्हाची तीव्रता खूप आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी ठिक ठिकाणी स्वच्छ फिल्टर युक्त अॅरोचे पाणी पिण्यासाठी सोय करण्यात आली असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी दिली. ते नातेपुते येथील रेणुका सभागृह येथे पालखी सोहळा नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
यावेळी पुढे बोलत असताना मालोजीराजे देशमुख म्हणाले की, विद्युत विभागाकडून डीपी दुरुस्ती व आवश्यकतेनुसार दिवे बसवणे, पालखी तळावर हायमास्ट सुरू करून लाईटचे जादा टॉवर उभे करणे,पालखी तळावर मोठा जनरेटर बसवणे, १५ ठिकाणाची जागा निश्चित करून ठिकठिकाणी १५०० फिरते स्वच्छालयाची उभारणी करणे, रस्त्यावरील खड्डे मुजवणे, पालखी तळावरील फाट्यावरील पुलाची रुंदी वाढवणे, आपत्कालीन मदत केंद्र, पालखीतळावर अग्निशामक बंबाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत दर्शन रांग सुरळीत चालावी यासाठी पोलीस कर्मचारी यांच्यासोबत महाराष्ट्र कमांडो फोर्स यांचे वीस कमांडो महिला,पुरुष नगरपंचायतीच्या वतीने नेमण्यात येणार असून पालखी अनुषंगाने नगरपंचायतीच्या वतीने सर्व नियोजित कामे पूर्ण झाली असल्याचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसाठी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य माऊली पाटील, नगरसेवक रणजीत पांढरे, सुरेंद्र सोरटे, नंदकुमार लांडगे तसेच उद्योजक अतुल बावकर आधी उपस्थित होते.
पालखी तळावर महिलांसाठी हिरकणी कक्ष व वैद्यकीय मदत केंद्र तयार करण्यात आले आहे तसेच खास महिलांसाठी पालखीतळावर सानगृह व चेंजिंग रूमची उभारणी करण्यात आली आहे तसेच निरा उजवा कालवा येथेही चेंजिंग रूमची व्यवस्था करीत आहोत गुरुवार दिनांक २२ रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते हिरकणी कक्ष, स्नानगृह व चेंजिंग रूमचे उद्घाटन होणार आहे.
माधव खांडेकर मुख्याधिकारी
0 Comments