Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने शासन स्तरावर सादर केलेल्या ऊसतोड कामगारांच्या हिताच्या मागणीला मोठे यश: संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार.

 तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने शासन स्तरावर सादर केलेल्या ऊसतोड कामगारांच्या हिताच्या मागणीला मोठे यश: संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


धाराशिव : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार बांधवाना सूचित करण्यात येते कि, तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने शासन स्तरावर सादर केलेल्या ऊसतोड कामगारांच्या हिताच्या मागणीला मोठे यश मिळालेला आहे.

        महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार 102 वर्ष्यापासून नोंदणी आणि इतर कल्याणकारी योजनेपासून वंचित होता.यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रभर आंदोलनाच्या, निवेदन,सततच्या मागणी अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त तथा लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष मा. नारनवरे साहेबांच्या मदतीने मंजुरी मिळालेली आहे.

      महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार बहुल संख्या असलेल्या मराठवाड्यातील सर्वजिल्हे,पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, व इतर सर्वदूर पसरलेल्या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश जिल्हा समितीवरील अधिकारी स्तरावर संबंधित bdo,ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना गावनिहाय नोंदणी करून ओळख पत्र देण्याबाबत आदेश देण्यात आलेला आहे.

      महाराष्ट्रातील जिल्हानिहाय ऊसतोड कामगार बांधवानी आजच आपली नोंदणी फॉर्म भरून ग्रामसेवक यांचेकडे सादर करून ओळख पत्र उपलब्ध करून घ्यावे!नोंदणी शिवाय सामाजिक न्याय विभागाकडून  भविष्यातील देण्यात येणाऱ्या योजना मिळणार नाही. याची गांभीर्याने नोंद घ्यावी!

        बंजारा समाज बांधव, मित्र मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी,यांना विनंती महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रियेत आपल्या स्तरावून अनमोल सहकार्याची अत्यंत गरज अपेक्षित आहे.

     महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या नोंदणी बाबत सर्व जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी साहेब,मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मा. प्रादेशिक उपयुक्त समाजकल्याण सर्व विभाग, मा. सहाय्यक आयुक्त जिल्हा समाजकल्याण सर्व यांनी त्यांच्या स्तरावर नोंदणीसाठी वेगवेगळ्या (लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षक मार्फत सर्वे )अशा पर्यायाचा अवलंब केलेला आहे. मात्र ओळख पत्र देण्याचा उद्देश  ग्रामसेवक यांच्या कडूनच आहे.तरी ऊसतोड बांधवानी त्वरित आपली नोंदणी करून घ्यावी हि विनंती.

तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाकडे सादर केलेल्या मागण्या  खालील प्रमाणे......

1. ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यासाठी त्वरीत गावनिहाय नोंदणी अभियान राबविण्यात यावे.


2. हार्वेस्टर मशिनला प्रति टन ऊस तोडणीसाठी देण्यात येणारे 450 रु. दर मनुष्यबळासही 'समान काम, समान वेतन' प्रमाणे मिळवून देण्यात यावे.


3. विमा योजना लागू करावी. प्रति गाळप हंगामात आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्या.

 4. ऊसतोड कामगारांना पेन्शन योजना लागू करावी.


5. कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक लाभ मिळवून देण्यात यावे.

6. ऊसतोड कामगारांना कारखाना स्तरावर रेशन उपलब्ध करून देण्यासाठीच्या कामात कारखाना प्रशासनाच्या

वतीने सहकार्य करण्याचे आदेश देण्यात यावेत.

7. कामगारांना ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी टेन्टची (तंबू) सुविधा मिळवून द्यावी.


8. कामगारांना सुरक्षात्मक पायातील घनबुट मिळवून द्यावे. अत्यावश्यक, संरक्षण कीट मिळवून देण्यात यावे.


9. ऊसतोड कामगारांच्या अविवाहीत मुलीच्या विवाहाकरिता आर्थिक मदत मिळवून द्यावी.

 10. कामगारांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.


11. ऊसतोड कामगारांना घरकुल योजना मिळवून द्यावी.


12. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर श्री. संत


भगवानबाबा शासकीय वसतिगृह मिळवून द्यावे..

13. ऊसतोड कामगारांना वृद्धापकालिन योजना लागू करावी.


14. ऊसतोड क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले वाहन चालक, मालक, वाहक यांना विमा संरक्षण मिळावे..

15. महिला ऊसतोड कामगारांना विशेष प्राधान्याने आरोग्य सुविधा पुरविण्यात यावे.

16. कारखाना स्तरावर पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची सोय करण्यात यावी.


17. कारखाना स्तरावर ऊसतोड कामगार, वाहन चालक, मालक, वाहक यांना विश्रांतीगृह उपलब्ध करून द्यावे.


18. प्रति टन 10 रु. शेष फंड लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ, पुणे यांच्याकडे जमा


करण्यासाठी साखर कारखान्यास आदेश व्हावे.


19. साखर उद्योगात मुकादम, ऊसतोड कामगार, वाहन मालक, वहातूकदार यांच्यात होणान्या आर्थिक फसवणूकीच्या वसुलीसाठी कडक कायद्याची तरतुद व्हावी.


20. ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक वाहन चालक यांच्या कडून शेतकऱ्यांची होणाऱ्या आर्थिक


पिळवणूकीबाबत कडक कायदा करण्यात यावा.


21. साखर कारखाना स्तरावर अपघाती मृत्यू पावलेल्या कामगारांच्या, चालक, मालक, वाहक यांच्या वारसांना


प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत मिळवून द्यावी.


22. साखर कारखाना प्रशासनासोबत ऊसतोड कामगार पुरवठा करण्यासाठी मुकादम, वाहन मालक यांच्यात करार होतात. करार करतेवेळी ऊसतोडीसाठी येणान्याच कामगारांची यादी घेण्याचे साखर कारखाना प्रशासनास आदेश व्हावेत.


मा. महोदय, तुळजाभवानी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासन स्तरावर ऊसतोड कामगारांच्या सादर केलेल्या मागण्यांना मंजूरी मिळावी. सदरच्या योजना अंमलात आणण्यासाठी सुधारीत शासन निर्णय व्हावे. असे झाल्यास आदरणीय महोदय, आपल्या हातून गोरगरीब ऊसतोड कामगारांवर झाल्याचे सिद्ध होईल,

    


           सुरेश हरिश्चंद्र पवार

           संस्थापक अध्यक्ष

    तुळजाभवानी ऊसतोड का. सं.

             महाराष्ट्र राज्य

           मो.8007503513

Post a Comment

0 Comments