पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महा-जनसंपर्क अभियानाची तुळजापूर, लोहारा येथे बैठक संपन्न
प्नतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
धाराशिव :देशाचे कणखर ,कर्तुत्ववान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ०९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महा-जनसंपर्क अभियान मोदी@9 कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव जिल्हाच्या तुळजापूर आणि लोहारा या दोन मंडळामध्ये बैठक घेऊन या अभियानात बाईक रॅली,युवा संवाद, नव मतदार नोंदणी, Y 20 चौपाल,युवा वॉरियर्स शाखा उद्घाटन हे सर्व कार्यक्रम प्रत्येक मंडळात करावे अश्या सूचना दिल्या आणि "युवा संवाद" चा कार्यक्रम लोहारा मंडळ मध्ये तुळजाभवानी मंदिर येथे पार पडला
यावेळी धाराशिव भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रभारी श्री अमोल जी निडवदे ,युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस गणेश जी देशमुख, सर्वश्री तुळजापूर मंडळ अध्यक्ष आनंद दादा कंदले, लोहारा मंडळ अध्यक्ष शुभम साठे जी,रत्नदीप भोसले ,शहर अध्यक्ष राजेश्वर कदम जी, कार्याध्यक्ष दयानंद मुडके जी ,राम चोपदार जी, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बागल जी,जिल्हा सचिव बालाजी चव्हाण ,ऋषी साळुंके जी,आप्पा पवार ,सागर पारडे जी,अमोल राजे जी, हिम्मत भोसले जी ,समर्थ पैलवान ,यांच्यासह भाजयुमो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments