आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे - २०२३ मिलेट ऑफ द ऑगस्ट मंथ - राजगिरा - श्री सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते
स्वातंत्र्याच्या आमृत महोत्सवात आपण आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे २०२३ सर्वत्र साजरा करत आहोत यामध्ये पौष्टिक तृणधान्य लागवड आहार वैद्यकिय दृष्ट्या महत्व प्रचार प्रसार प्रसिद्धी चालू आहे . ऑगस्ट मंथ ऑफ मिलेट राजगिरा आहे या विषयी माहिती करून घेऊया . राजगिरा मिलेट शोभेचे झाड ' पाने ,देड , भाजी म्हणून बीया पौष्टीक तृणधान्य म्हणून आहारात उपयोग केला जातो राजगिरा हिरवा ,गुलाबी , पोपटी , तिरंगा या रंगात येतो .
राजगिराचे आहार व वैदयकिय महत्व आहे:-
१ केस वाढणे व निगा राखणेस मदत होते
२ - अन्न पाचन व प्रचन प्रक्रिया सुधारणेस मदत करते
३ -हुदयविकारास प्रतिकारक आहे . सिग्धपदार्थ चयापचय प्रक्रियेस चालना देते
४- मासपेशीया बळकट करणेस मदत होते
५ - मधुमेह नियंत्रणास मदत करतो कारण इन्शुलीन निर्मितीस चालना देतो
६ - मोतीबिंदू होऊ देत नाही
७- पोटाचे विकारावर गुणकारी आहे.
८- कर्करोग विकास प्रतिबंधक व रोधक आहे.
९- व्हिटॅमिन सी.-५ बी, बी कॉम्लेक्स ,व्ही -ई व डी आणि स्टिरॉईडने समृद्ध आहे.
१०- शरीरातील हुदय, यकृत , किडणी व महिला जननइंद्रीय थंड राखणेस उपमुक्त आहे
११- शरीरातील हार्मोन्स संतुलन करणेस मदत होते मानसिक रोगावर उपयुकत.
१२ - शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढणेस चालना देते १३ - बीयातील तेल जीवाणू वाढीस प्रतिबधक, ऑटीइंफलीमेटरी , अँन्टीटूमर गुणधर्माचे आहे कोरोना उपायों
१४ त्त्वचा विकार कमी होऊन त्वचा सुधारणेस कृष्ट रोग मध्ये गुणकारी आहे.
१५ पेशी पूर्णज्जीवन ,नुतणीकरण उपयुक्त आहे आहे.
१६ - खाद्यरंग तयार करणेस वापर केला जाती
१७- राजगीरा लागवड केल्याने लव्हाळा तणाचा बंदोबस्त केला जातो म्हणजेच अष्टपैलूगुणधर्म राजगीराचा उपयोग लठठपणा उच्चरक्तदाब , 'त्वचारोग , मानसीक असंतुलन हदयरोग , कर्करोग , मज्यासंस्था , हिपॅटायरीस , महिला रोग , हर्मोनल असंतुलन या सर्वचर उपचार व उपाय केला जातो .
राजगीरा पृथ्वीवरील अमृत आहे यात काय शंका नाही म्हणून यांची लागवड करा स्वतः वापरा व इतरांना वापरण्यास दया व सदृढ व आरोग्य पीढी बनवण्यास हातभार लावून मेक इंडिया स्वयंनिर्भर साठी प्रयत्न काळाची गरज आहे . लागवडी विषयी माहिती जाणून घेऊया ! प्रमुख्याने रब्बी हंगामात या पिकाची लागवड गव्हू हरभरा मध्ये अंतरपीक व सोल म्हणून केली जाते . पेरणी साठी १.५ ते २ किलो बियाणे मातीत मिश्रण करून पेरणी १.५ सेमी वर १५ ऑक्टो ते ७ नोव्हेबर कालावधीत मध्यम ते भारी जमिनीत ४५ सेमी x १५ से.मी वर केली जाते . हेक्टरी ६० किलो नत्र + ४० किलो स्फुरद + २० किलो पालाश पेरणी वेळी ५०% व १ महीन्याने द्यावे . पीकाचा कालावधी ३.५ ते ४ महीन्याचा असतो या कालावधीत १५ दिवसाचे अंतराने पाणी दयावे पेरणी नंतर १ महिन्याने वीरळणी करून त्याची भाजी म्हणून विक्री करता येते . राजगिरा बीया साठी लागवड केली असेल तर बीयाचे : ६क्वि येते व बीयाणेस १०० रुप्रति किलो दराने विक्री होते . बीयाचा उपयोग तेल काढणे चक्की , बर्फी , लाडू , वड्या पराठे, थालीपीठ साठी वापर केला जातो . राजगीरा अष्ट्रपैलूगुणधर्म असलेल्या आहारातील अनन्यसाधारण महत्व व वैद्यकिय असाध्य रोग उपचारावर एकमेवद्वितीय उपाचार चे महत्व आहे. या द्वारे अपणास अहवान करण्यात येते राजगीर पिकवा ! खा! स्वस्थ रहा! ईस्ट टू वेस्ट नॉर्थ टू सायुथ मिलेट इज द बेस्ट !! मिलेट ऑफ द मथ ऑगस्ट राजगिरा !!
0 Comments