धाराशिव :ऑक्सीजन प्लांटच्या साहित्याची चोरी; सव्वातीन लाखाचे साहित्य लंपास -
धाराशिव : धाराशिव शहरातील सांजा बायपास रोड परिसरात चोरी करून चोरट्याने ऑक्सिजन प्लांट चे सव्वा तीन लाख रुपयांच्या साहित्य लंपास केले. ही घटना 26 नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत घडली याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी नामे-सारीका भाउसाहेब बेलुरे, वय 40 वर्षे, रा. शिवाजी नगर सांजा बायपास रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे ऑक्सीजन वॉल 35 नग, कॉपर झिंक फ्लेक्झीबल नोजल बोल्ट, ईनरशेट 40 नग, आरटींग कॉपर पट्टी, पाईप 13 मीटर पाईप, असा एकुण 3,19,000₹ किंमतीचे साहित्य हे दि.26.11.2025 रोजी 09.00 ते दि.01.12.2025 रोजी 06.00 ते 21.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सारीका बेलुरे यांनी दि.04.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. शहरामध्ये चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तात्काळ चोरट्याच्या मुस्क्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

0 Comments