जालना येथील मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणाने संपूर्ण राज्याची लक्ष वेधून घेतले आहे, 29 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या या मराठा समाजाच्या आंदोलनाला 1 सप्टेंबरच्या संध्याकाळी पोलिसाच्या लाठी चार्ज मुळे गालबोट लागला, अन काय जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील परिस्थिती, चिघळली आता तेथील परिस्थिती निवळी असली तरी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावांमध्ये आंदोलन स्थळी राज्यातील कानाकोपऱ्यातील विविध पक्षाचे नेते, संघटना, समाजसेवक गाठीभेटी घेत आहेत, आणि आश्वासन देऊन निघून जात आहेत, मागील चार वर्षापासून थंडावलेला मराठा आरक्षणाचा मोर्चा पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आला आहे पण ज्या व्यक्तीने मराठा आरक्षण मागणीचा विषय लावून धरला ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आज आपण मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत.जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास
मनोज जरांगे पाटील मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे, जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते कामासाठी जालना जिल्ह्यातील अंबड मधील अंकुश नगर येथे स्थायिक झाले, आणि येथील एका हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली जरांगे पाटलाच्या घरची परिस्थिती आर्थिक बेताचीच पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिले असे येथील माध्यमांनी सांगितले . जरांगे पाटील यांची बारीक शरीरदृष्टी कपाळावर उभ कंकू, आणि गळ्यात भगवा उपरणं घातलेले साधी राहणीमान .मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई वडील असा मनोज जरांगे पाटील यांचा कुटुंब परिवार आहे.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात कसं योगदान दिलंय ?
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत जरांगे पाटील यांनी कित्येक मोर्चे काढले ,आमरण उपोषण केली, रास्ता रोको आंदोलन केले, याच कामाच्या जोरावर त्यांना काँग्रेस पक्षाने जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पद दिले, पण त्यांना काँग्रेसपक्ष मधील विरोधी भूमिकेमुळे काँग्रेसची फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापना केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली, यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपीवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यावर आरोप झाला होतं.
शिवरायांचे नाव घेऊन मोगलसारखं राजकारण करता आता मराठा सोबत बहुजन समाज आहे फडणवीस आम्ही वाटच बघतोय. असा संभाजी राजे आंदोलन करणे हा मनोज जरांगे पाटील यांचा स्वाथीभाव. यानंतर सन 2021 मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगाव मध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं. याशिवाय सहा दिवस उपोषणही केलं, गोरी गंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांना मदत मिळवून दिली होती.
मनोज जरांगे पाटील यांचे 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय नेतृत्व
मनोज जरांगे पाटील 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत, त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्तालावर काढलेल्या मोर्चाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलं होतं. आत्तापर्यंत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तब्बल 35 हुन अधिक मोर्चे, आंदोलने केली आहेत. दरम्यान समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी शनिवारी अगदी सकाळी संभाजी राजे जातीने उपस्थित राहिले, खुद्द छत्रपती आल्याचे पाहून जरांगे पाटलाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले, तेव्हा राजनी ही पुढे मागे न पाहता आपल्या रुमालाने जरांगे पाटलाची अश्रू पुसत रडायचं नाही आता लढायचं असं निर्धार बोलून दाखवला. तेव्हा जरांगे पाटील यांनी हे डोळे पुसत राजेच्या हातात हात देऊन आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असे उदगार काढले.
मात्र गेल्या चार वर्षापासून थंडावलेला मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहेत. त्याला कारण ठरलं जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावातील मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य समाज मराठा असला तरी या समाजामध्ये अनेक गरीब मराठा समाज बांधव आहेत याची कल्पना जरांगे पाटील यांना होती, त्यातूनच त्यांनी 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय झाले होते.
मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशा मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारले अन काही दिवसातच त्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल घेतली परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण सुरूच ठेवले, मात्र शांततेत सुरू असलेलं आंदोलन 1 सप्टेंबर च्या सायंकाळी पोलिसांनी आंदोलनाकावर लाठी चार्ज केला यात अनेक महिला आंदोलक, वृद्ध ,विद्यार्थी, गंभीर जखमी झाले. या सगळ्यामुळे ज्याच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे ते म्हणजे जरांगे पाटील. आज हे आंदोलन सुरू आहे, अजूनही जरांगे पाटील यांनी माघार घेतलेली नाही, ् जोपर्यंत मराठा समाजाला कायदेशीरीत्या आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माघार नाही असे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील सांगत आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध संघटना, समाजसेवक, नेते पक्ष यांचा पाठिंबा मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन प्रवासाविषयी थोडक्यात घेतलेला आढावा आहे.
शब्द संकलन :राजगुरू साखरे
0 Comments