रॉकेल टाकून पत्नीला पेटवले., पतीस जन्मठेपेची शिक्षा अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायालयाचा निकाल
अंबाजोगाई: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत खून केला. याप्रकरण पतीस दोषी ठरवत अंबाजोगाई न्यायालयाचे अप्पर सत्र न्यायाधीश दीपक खोचे यांनी त्याला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
रामभाऊ तुकाराम होळंबे राहणार हाळंब तालुका परळी असे आरोपीचे नाव आहे. परळी तालुक्यातील हळंब येथील रामभाऊ तुकाराम कोळंबे यांनी त्यांची पत्नी भाग्यश्री हिला औरंगाबादला जाऊ असे सांगितले होते, परंतु चार दिवसापूर्वी परभणी येथे चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केल्यामुळे भाग्यश्रीने औरंगाबाद जाण्यास नकार दिला. त्यावरून आरोपी रामभाऊ यांनी पुन्हा संशयावरून भांडण काढले व रागाच्या भरात भाग्यश्रीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या घटनेतील पूर्णता भाजली होती. उपचारासाठी तिला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते, उपचार सुरू असताना 18 ऑक्टोंबर 2015 रोजी भाग्यश्री चा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी रामभाऊ तुकाराम होळंबे विरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले. सदरील प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दीपक खोचे यांच्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले. या प्रकरणांमध्ये फिर्यादीचा मृत्यू पूर्व जबाब महत्त्वाचा ठरला. सरकारी वकील शिवाजी मुंडे यांनी 14 साक्षर तपासत आरोपी विरुद्ध ठोस पुरावे सादर केले. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद व पुरावा ग्राह्य धरून आरोपी रामभाऊ तुकाराम होळंबे यास जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ठाकूर पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबुराव सोडगीर, व पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगल दोनगहू यांनी काम पाहिले.
0 Comments