/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> वीज कोसळून तरुण शेतकरी ठार धाराशिव जिल्ह्यातील घटना

Hot Posts

वीज कोसळून तरुण शेतकरी ठार धाराशिव जिल्ह्यातील घटना

वीज कोसळून तरुण शेतकरी ठार धाराशिव जिल्ह्यातील घटना 


 कळंब : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथे एका तरुण शेतकऱ्याचा सोयाबीनची गंज झाकत असताना वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील 21 वर्षे तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. अजय आसाराम गायकवाड राहणार भाटशिरपुरा असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी पाऊस पडत असल्याने पावसाची पाणी सोयाबीनच्या गंजीत शिरू ने याकरिता ती झाकण्यासाठी व पाण्याला रस्ता म्हणून चर काढण्याचे काम तो करत होता .यावेळी अचानक त्यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments