/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> पत्नीच्या अनैतिक संबंधातून पतीचा खून; तीन आरोपींना बेड्या, धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई-MurderCrime areest Accuse

Hot Posts

पत्नीच्या अनैतिक संबंधातून पतीचा खून; तीन आरोपींना बेड्या, धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई-MurderCrime areest Accuse

पत्नीच्या अनैतिक संबंधातून पतीचा खून; तीन आरोपींना बेड्या, धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई-MurderCrime areest Accuse

धाराशिव : प्रतिनिधी

धाराशिव तालुक्यातील कुमाळवाडी शिवारात झालेल्या एका निर्घृण खून प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत धाराशिव ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत तीन आरोपींना अटक केली आहे. या खुनामागे मयताच्या पत्नीचे संशयितासोबत असलेले अनैतिक संबंध हे कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पत्नीच्या सांगण्यावरून दोन आरोपींनी चाकूने वार करून व दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

दिनांक १३ जुलै २०२६ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याला कुमाळवाडी शिवारात एका अनोळखी पुरुषाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची माहिती फोनद्वारे मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी सुमारे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ उभी असलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल तपासासाठी महत्त्वाचा धागा ठरली. मोटारसायकलच्या नोंदणीच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख दगडू देशमुख (रा. येडशी) अशी पटवून दिली.

घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खरोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान मयताची पत्नी आणि संशयित आरोपी यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संशयित बालाजी महादेव पायघन (वय ३५, रा. सातनाक वस्ती, पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) याचा शोध घेण्यात आला. तो आपल्या मेहुण्यासोबत पुण्यात असल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत दुसरा संशयित सोमनाथ सातनाक हाही पोलिसांच्या हाती लागला.

चौकशीत दोन्ही आरोपींनी मयताची पत्नी दैवशाला संतोष देशमुख हिच्या सांगण्यावरून दगडू देशमुख यांचा चाकूने वार करून व दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर बालाजी महादेव पायघन, सोमनाथ सातनाक आणि दैवशाला संतोष देशमुख या तिघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खरोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार तसेच ग्रामीण पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments