Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर: महायुतीच्या पाठबळावर जिल्ह्याचा कायापलट करण्यासाठी कटीबद्ध :आ. राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर: महायुतीच्या पाठबळावर जिल्ह्याचा कायापलट करण्यासाठी कटीबद्ध :आ. राणाजगजितसिंह  पाटील


तुळजापूर : या भागाचा व्यापक आणि सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करीत असलेल्या प्रामाणिक कामाला मतदार बंधू-भगिनीने मोठे समर्थन दिले पुढील काळात महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा आणि जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध आहे असे महत्त्वपूर्ण प्रकल्प पुढे न्यायायाचे आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित दादा पवार यांनी मोठे पाठबळ दिले. त्यामुळेच मागील अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले अनेक प्रकल्प आणि योजना पूर्णत्वाकडे आल्या आहेत. महायुती सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयामुळे राज्यातील जनतेने हा कौल दिला आहे आपण केलेल्या प्रामाणिक कामावर विश्वास ठेवून सलग तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी मतदाराचे धन्यवाद मानले आहेत.

भाजपा आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे .2014 पासून सलग तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदार बंधू भगिनींचे जाहीर आभार मानले मागील 40 वर्षापेक्षा अधिक काळापासून माजी मंत्री तथा जिल्ह्याचे नेते पद्मसिंग पाटील साहेबांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आणि योजना जिल्ह्यात राबवल्या एका निर्णयात टप्प्यापर्यंत धाराशिव जिल्ह्याला त्यांनी आणून ठेवले 2001 साली त्यांच्यामुळेच कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला तेथूनच पुढच्या नव्या अर्थक्रांतीचा शुभारंभ आपण हाती घेतला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या मान्यवर नेते मंडळींनी सहकार्य केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या हक्काचे पाणी डिसेंबर अखेरीस जिल्ह्यात दाखल होत आहे.

जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले अनेक प्रकल्प आणि महत्वाच्या योजना महायुती सरकारच्या माध्यमातून मागील अडीच वर्षात एका निर्णय टप्प्यावर येऊन थांबले आहेत. तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आपण आणण्यात यश आले आहे कौडगाव, तामलवाडी एमआयडीसीतील रोजगार निर्मितीला गती आली आहे पुढील काळात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या बाबी राबविण्याचे ठरवले आहे.त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे केवळ विकास कामाच्या बळावर आपण निवडणुकीला सामोरे गेलो मतदारांनी प्रामाणिक कामाला पसंती देत मोठे मताधिक्य देऊन विजय केले त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद पुढील काळात कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि संत श्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सोबतीने आपला मतदार संघ आणि संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार पाटील म्हणाले.



🛑तुळजापूर विधानसभेवर दुसऱ्यांदा कमळ फुलले राणाजगजितसिंह  पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय

तुळजापूर शहरातून भव्य विजय रॅली मिरवणूक

_________________________________

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/bX0t6IY_r9I?feature=shared

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बालाघाट न्यूज टाइम्स यूट्यूब चैनल ला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा


Post a Comment

0 Comments