Hot Posts

6/recent/ticker-posts

भोसले कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीराचा समारोप

भोसले कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीराचा समारोप


धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे आंबेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचा आज दिनांक ११ जानेवारीला समारोप झाला. या शिबीर कालावधीत ग्राम स्वच्छता, रस्ते स्वच्छता, गाजर गवत निर्मुलन, वृक्षारोपन, शोषखड्डे, गटार दुरुस्ती, मंदिर सफाई, समाज मंदिर सफाई इत्यादी कामे करण्यात आली. तसेच एड्स जनजागृती, बालविवाह प्रतिबंधक जनजागृती, अंधश्रद्धा निर्मुलन, हागणदारी मुक्त गाव जनजागृती, दारुबंदी विषयी संवाद व विविध विषयावरील व्याख्याने असे विविध उपक्रम राबवण्यात आले. शिबिरातील स्वयंसेवकांना क्षेत्रभेटीची अनुभूती यावी म्हणून त्यांना गावातील प्रगतशील शेतकरी श्री. नवनाथ क्षिरसागर यांच्या शेतातील केळी फळबाग तसेच प्रगतिशील शेतकरी श्री. योगेश जाधव यांच्या चिकू फळबागेला भेट देण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून गावचे प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. नवनाथ क्षिरसागर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंबेवाडी गावचे सरपंच श्री. पांडुरंग तात्या सुतार उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी उपसरपंच गोडसे, केशेगाव सर्कलचे वैद्यकीय अधिकारी श्री. मिसाळ साहेब, पालक प्रतिनिधी श्री. राऊत, गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय क्षिरसागर, सौ. श्रुती विजय क्षिरसागर  यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, आंबेवाडी येथील मुख्याध्यापक श्री. एस. एस. निंबाळकर, सहशिक्षक श्री. डी. व्ही. बोंदर, श्री. आर. एल. बारखडे सर, सौ. एम. एस. दराडे मॅडम, सौ. एस. व्ही. वाघे मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती.  तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्यक्रमाधिकारी सौ. एस. एल. जाधव मॅडम आदींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री. एस. व्ही. पाटील सर तर आभार सहकार्यक्रमाधिकारी श्री. के. बी. मोहिते सर यांनी मानले. शिबिरासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.


     या शिबिरासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, प्रशासकीय अधिकारी श्री. एस.एस. देशमुख सर आदींचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments