शहरातील महाविकास आघाडीचे माजी मंत्री. आ. जितेंद्र आव्हाड यांचे स्वागत डिजिटल बॅनर हटवल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून नगरपरिषद कार्यालयात केला निषेध-
धाराशिव : तुळजापूर येथील नगरपरिषद चे मुख्य अधिकारी श्री रणदिवे यांच्याकडून महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या शहरातील स्वागत डिजिटल बॅनर केवळ चार तासात उतरवण्यात आले ह्या संदर्भात तुळजापूर शहरातील महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे नेते मंडळी कडून जाहीर निषेध करण्यात आला तसेच दिनांक 7 रोजी
महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचे शहरातील सर्व बॅनर डिजिटल विनापरवाना शहरात लावले असताना आजतागायत शहरात झळकत आहेत तरीसुद्धा तुळजापूर शहरात महाविकास आघाडीला नगरपरिषद चे प्रशासन दुजाभाव करत आहे या सर्व जबाबदार नगर परिषदेचे सिओ यांना महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी गण नगरपरिषद मध्ये उपस्थित असताना नगरपरिषद सीईओ गैरहजर असल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अडवोकेट धीरज पाटील जनसेवक अमोल कुतवळ शिवसेनेचे सुधीर कदम माजी नगरसेवक रणजीत इंगळे माजी नगरसेवक राहुल खपले इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके राष्ट्रवादीचे शरद जगदाळे धैर्यशील पाटील अमर चोपदार काँग्रेसचे ऋषिकेश मगर अनंतराव जगताप कल्याणराव जगताप नरेश पेंदे अर्जुन साळुंखे शरद जगदाळे,अक्षय परमेश्वर कदम आदी महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments