तुळजापूर तालुक्यातील येवती येथील शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांच्या दोन एकर ऊसाला फडाला भिषण आग; शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान-Tuljapur Yevti Farmers sugarcane Damage

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील येवती येथील शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांच्या दोन एकर ऊसाला फडाला भिषण आग; शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान-Tuljapur Yevti Farmers sugarcane Damage

तुळजापूर तालुक्यातील येवती येथील शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांच्या दोन एकर ऊसाला फडाला भिषण आग; शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान- 


धाराशिव:  तुळजापूर तालुक्यातील येवती येथे शनिवारी भर दुपारी अचानक शेतातील तोडणीला आलेल्या ऊसाच्या फडाला आग लागून २ एकरावरील ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून, शेतकऱ्याचे अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, येवती येथील शेतकरी आणासाहेब  सिद्राम शिंदे  यांनी आपल्या गट क्रमांक १७६ वरील 2 एकरच्या क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. ऊस काढणीला येऊन ऊस शेतात उभा होता.  शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास  अज्ञात व्यक्तींनी उसाच्या फडास आग लावली. 

या घटनेची माहिती मिळताच शेतकरी शिंदे यांनी उसाच्या शेताकडे धाव घेतली त्यावेळी त्यांनात्यांच्या गट क्रमांक १७६ मधील २ एकरावरील सर्व ऊसाने पेट घेऊन आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे प्रमाण एवढं होतं की, आग विझवण्यासाठी अनेक प्रयत्न करुनही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न करुन काहीच फायदा झाला नाही आणि तोडणीस आलेला ऊस जळून त्याची चिपाडं बनली. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झाल्यानं आर्थिक संकटात संपले आहेत. या घटनेची माहिती कृषी विभाग व महसूल विभागांना दिली आहे. याप्रकरणी उसाची नोंदणी केलेल्या कारखान्याने तात्काळ हा ऊस नेण्यात यावा अशी मागणी शेतकरी श्री अण्णासाहेब शिंदे यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments