अल्पवयीन मुलीवर तरुणाकडुन लैंगिक अत्याचार; जाब विचारण्यास गेलेल्या नातेवाईक व भावास बेदम मारहाण - तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-Posco Crime News Naldurg police station

Hot Posts

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर तरुणाकडुन लैंगिक अत्याचार; जाब विचारण्यास गेलेल्या नातेवाईक व भावास बेदम मारहाण - तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-Posco Crime News Naldurg police station

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून  लैंगिक अत्याचार; जाब विचारण्यास भावास  रॉडने बेदम मारहाण - तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील एका तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी तरुणास विचारणा करीत असताना शिवीगाळ लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून धमकी दिली आहे.याप्रकरणी पिढी तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तरुणाविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत, व इतर तीन जणांविरूध्तद मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील नळदृग पोलीस ठाण्याचे हद्दीतील एका गावातील 14 वर्षीय मुलगी दि.15.12.2025 रोजी 14.00 ते  दि. 15.12.2025 रोजी 18.00 वा. सु. हि घरी  एकटी असताना गावातील एका तरुणाने तिचे घरी येवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. नमुद मुलगी व तिचे नातेवाईक हे नमुद तुरुणास विचारणा करीत असताना नमुद तरुणांनी जातीवाचक शिवीगाळ करुन नमुद मुलीचे भावास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व इतर तीन तरुणांनी नमुद मुलीचे भावास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी लोखंडी रॉड, काठी व दगडाने मारहाण जखमी करुन धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.17.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 65, 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5 सह 4, 6 पोक्सो ॲक्ट सह अ.जा.ज.अ.प्र. कलम 3(1)(डब्ल्यु) (i)(ii), 3(2)(v), 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments