बस मध्ये हाफ तिकीट काढण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड दाखवण्याच्या कारणावरून बस चालकास बेदम मारहाण;चार जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल-Crime News Kalanb Police Station

Hot Posts

6/recent/ticker-posts

बस मध्ये हाफ तिकीट काढण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड दाखवण्याच्या कारणावरून बस चालकास बेदम मारहाण;चार जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल-Crime News Kalanb Police Station

बस मध्ये हाफ तिकीट काढण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड दाखवण्याच्या कारणावरून बस चालकास बेदम मारहाण;चार जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल-


धाराशिव प्रतिनिधी रुपेश डोलारे : वडिलांचे हाफ तिकीट काढण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड दाखवण्याच्या कारणावरून एका बस चालकास चार जणांनी मिळून बेदम लाथा बुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे .ही घटना दिनांक 22 रोजी घडली या प्रकरणी बस चालक निखली शरद अडसूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जनाविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,फिर्यादी नामे-निखली शरद आडसुळ, वय 45 वर्षे, व्यवसाय-चालक कळंब आगार रा. ईटकर ता. कळंब जि. धाराशिव  हे दि.22.01.2026 रोजी 22.00 वा. सु. पुणे एस टी बस घेवून जात असताना आरोपी नामे- अभिजीत बाळासाहेब मडके, ज्ञानेश्वर उर्फ माउली मडके, सचिन देडे व इतर एक इसम यांनी वडीलांचे हाफ तिकीट काढण्यासाठी ओरिजनल आधाकार्ड दाखवण्याच्या कारणावरुन शासकीय कामात अडथळा आणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन तुम्ही जर या रोडवर ड्युटीला आलातर बघुन घेण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निखील आडसुळ यांनी दि.23.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे कळंब येथे भा.न्या.सं.कलम 132, 121(2), 126(2),352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments