अवैद्य गांजा शेतीवर छापा;एका शेतकऱ्यास अटक-अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धाराशिव जिल्ह्यात कारवाई -
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मौजे देवळाली येथे एका शेतकऱ्याने शेत जमिनीवर अवैध गांजा लागवड केलेची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजीनगर कृती विभाग यांना समजली होती त्यानुसार या विभागांनी दिनांक 24 रोजी छापा टाकुन सदर शेतकऱ्यावर कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 23 रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजी नगर कृती विभाग यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की मौजे देवळाली तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील शेत जमिनीत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांजाच्या झाडाची अवैध्यरित्या लागवड करण्यात आली आहे. त्यावरून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजी नगर कृती विभाग यांनी दिनांक 23 रोजी मौजे देवळाली तालुका भुम जिल्हा धाराशिव येथील गोकुळदास रावसाहेब हावळे वय ५० वर्षे यांचे मौजे देवळाली शहरातील शेत गट नंबर 462 मध्ये छापा कारवाई केली असता तेथे शेत जमिनीवर गांजा वनस्पती ची अवैद्यरित्या लागवड करून देखभाल व रखवाली करताना मिळवून आली.
त्यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून गांजाची एकूण लहान मोठे 52 झाडे उपटून गठ्ठे बांधून वजन करता 16 किलो गांजाची झाली किंमत 71 हजार रुपयांचे मिळुन आल्याने जप्त करण्यात आले आहे .सदर प्रकरणात पोलीस ठाणे परंडा जिल्हा धाराशिव येथील अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स संभाजीनगर कृती विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहन मुल्ला यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 43/2026 कलम 8 (क) 20 (ब) 11 (ब) एन डी पी एस कायदा 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी गोकुळदास रावसाहेब हावळे यांना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई ही अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत मॅडम ,पोलीस अधीक्षक श्री अजित टिके साहेब ,डी वाय एस पी श्री गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली पाटील संपकाळ सहायक पोलीस निरीक्षक वाहत मुल्ला ,हनुमान पुरके हवालदार शैला टिके ,सुरेश राऊत ,नागेश केंद्रे ,निलेश सरफाळे येथील जाधव रवींद्र साळवी ,सुरज ज्ञानेश्वर चव्हाण ,आम्रपाली सूर्यवंशी यांनी केली आहे.
युवा वर्ग नवे च्या आहारी जात असल्याने असे प्रकारचे कोणतेही नशेची गांजा ड्रग्स ,अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे लागवड करणारे गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना केलेली असून जनतेने अशा लोकांची माहिती देण्याबाबत याबाबत संदेश देण्यात येत आहे.

0 Comments