अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सुनेने काढला सासूचा काटा, सुनेसह प्रियकर व सुनेच्या भावाला ठोकल्या बेड्या -Murder Crime Nanded Deglur

Hot Posts

6/recent/ticker-posts

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सुनेने काढला सासूचा काटा, सुनेसह प्रियकर व सुनेच्या भावाला ठोकल्या बेड्या -Murder Crime Nanded Deglur

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सुनेने काढला सासूचा काटा, सुनेसह प्रियकर व सुनेच्या भावाला ठोकल्या बेड्या


-

नांदेड : हदगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून नोकरीला असलेल्या कमलाबाई क्षीरसागरे यांचा त्याच्या सुनेने व भावाने आणि प्रियकरांनी मिळून संगणमतानी खुन (-Murder)  केला. दुसऱ्या रात्री मृतदेह निर्जन ठिकाणी देऊन टाकला. या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. कमलाबाईची अमानुष  हत्या त्यांच्या सुनेने घडवली असून अनैतिक संबंधात सासू अडसर ठरत असल्याने केले हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता 28 जानेवारीपर्यंत पोलीस कु ठरली(PCR) सुनावण्यात  आली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेला अधिक माहिती अशी की हदगाव (Hadgaov)तहसील कार्यालयात पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर शिपाई म्हणून कमलाबाई शिरसागरे या कार्यरत होत्या शहरातील गौतम नगर मध्ये त्या राहत होत्या कमलाबाईंना एकुलता एक मुलगा होता त्याला दारूचे व्यसन होते या दारूमुळे त्यांची लिव्हर खराब(Liver Damage) झाल्याने त्याचा दोन महिन्यापूर्वी मृत्यू झाला. तरुण सून घरात असल्यामुळे कमलाबाई सतर्क राहत होत्या मुलाच्या व्यसनामुळे या महिलेची इतरत्र सूत जुळले असल्याची चर्चा होती. कमलाबाई व तिच्या सुनेचे याच कारणावरून वारंवार वाद होत असत .सासूच्या जाचातुन सुटण्यासाठी मात्र तिने अघोरी उपाययोजना आखली. सुनीता हिने आपल्या लफड्यात अडथळा ठरणाऱ्या सासूचा काटाच काढला .शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी उत्तर रात्री दोन वाजेच्या सुमारास सासू कमलाबाई गंगाधर शिरसागर वय ५४  ही गाढ झोपेत होती. ही संधी साधून सुन सुनिता नागेश क्षीरसागर वय 35 तिचा प्रियकर परमेश्वर किसन वानखेडे वय 26 राहणार वटफळी तालुका हिमायतनगर  यांनी कमलाबाई चा स्कार्फने मरेपर्यंत गळा आवळून खुन केला . खुन केल्याचे कोणाला कळू नये म्हणून मृतदेह घरातच पलंगाखाली लपवून ठेवला प्रियकर परमेश्वर यांनी नातेवाईक मित्र अक्षय नारायण कदम यांनाही मदतीला घेतले.

दरम्यान ही बाब सुनीताचा भाऊ अमोल मिटकरी याला समजले त्यांनी सुद्धा या कामी त्यांना मदतच केली दिनांक 10 जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या   सुमारास पयत कमलाबाईचा मृत दह (Deathbody)पोत्यात भरून दुचाकीवरून अनिल पाटील बाभळीकर यांच्या घरासमोरून राजेश बार जवळून ताबसा मार्गावर पुरावा दृष्ट करण्याच्या उद्देशाने वाळकी फाटाकडे राहिला. तेथे पेट्रोल पंपाच्या पाठीमागे (Petrol pump)असलेल्या छोट्या कोरड्या तलावात कमल चा मृतदेह टाकून देण्यात आला. याप्रकरणी मयताच्या नातु सतीश वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस आणि १३ रोजी कमलाबाई हरवल्याची नोंद (Missing Complaint)केली होती ;परंतु त्यानंतर दोन तासातच कमलाबाईचा मृतदेह सापडला होता. हदगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे व चमुने हा खुनाचा गुन्हा असल्याचे निष्पन्न झाल्यावर तपासाची चक्री फिरवली. पोलीसांनी  घराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज (Cctv Futage)तपासले तसेच मयताच्या फोनचे कॉल डिटेल्स काढून योग्य दिशेने तपास केल्यावर यातील आरोपी मयताची सुन सुनिता  नागेश क्षीरसागरे वय ३५(रा. गौतम नगर हदगाव) प्रियकर परमेश्वर किसन वानखेडे 26 (राहणार वटफळी तालुका हिमायत नगर) सूनेचा भाऊ अमोल लोभाजी इटकरे वय 38 राहणार नागापूर तालुका उमरखेड व प्रियकरचा नातेवाईक  मित्र अक्षय कदम वय 26 राहणार (देवघा बाजार तालुका हादगाव )यांनी संगनमत करून कमलाबाईचा खुन(-Murder Crime)   केल्याचे निष्पन्न झाले.

या खुनाचा उलगडा झाल्यावर उपनिरीक्षक गजानन बर्गे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोदा रजिस्टर नंबर १९ / 26 दाखल करण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुन सुनिता  शिरसागर प्रियकर परमेश्वर वानखेडे प्रियकरचा मित्र अक्षय कदम ,सुनिता चा भाऊ अमोल मिटकरी यांना अटक केली त्यांना हदगावच्या न्यायालयात (Hadgaov Court) हजर केले असता त्यात 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा छडा सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे पोलीस उपनिरीक्षक गजानन बर्गे ,पोलीस नाईक टेबल रोहन सुरकुंटे ,नागेश गायकवाड ,डेबोजी गायकवाड़, प्रकाश द देशमुख, जयवंत गायकवाड ,अर्चना बोरले पवार यांनी लावला.

Post a Comment

0 Comments