चिवरी येथे अणदुर जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद --Tuljapur Chivari-

Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे अणदुर जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद --Tuljapur Chivari-

चिवरी येथे  अणदुर  जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-


चिवरी/बिभिषन मिटकरी  : तुळजापूर तालुक्यातील अनदुर जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र कानडे व चिवरी पंचायत समिती गणातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भोसले यांच्या प्रचारचा चिवरी येथे नारळ फोडून शुभारंभ दिनांक 30 रोजी करण्यात आला. या प्रचार शुभारंभाच्या वेळेस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अणदुर  जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या अणदुर, चिवरी, बसवंतवाडी, देवसिंगा तुळ, धनगरवाडी, बोरनदीवाडी, आरळी खुर्द,गंधोरा, वडगाव देव,या नऊ गावचा समावेश आहे .या गावांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण अणदुर  जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी राखीव आहे या गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वच्छ प्रतिमेचा  शैक्षणिक क्षेत्रातील आरोग्य क्षेत्रातील चांगला अनुभव, उत्तम जनसंपर्क आणि कार्यक्षम नेतृत्वाची ओळख असलेले डॉ जितेंद्र कानडे  यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पंचायत समिती चिवरी पंचायत समिती गणामध्येही सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी राखीव असल्याने, शिवसेनेच्या वतीने गंधोरा गावचे संजय भोसले यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्यात आले आहे.

डॉक्टर जितेंद्र कानडे हे अंदुर ग्रामपंचायत वर सदस्य म्हणून निवडून आले होते. सामान्य नागरिकांशी असलेले अतूट नाते ,सखोल अनुभव, जनतेशी थेट संवाद साधण्याची शैली आणि काम करून दाखवण्याची क्षमता यामुळे ते जनसामान्यांमध्ये विश्वासाचे नाव बनले आहेत. विकासकामांचा ठसा उमटवत त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर अणदुर  गटातील गावोगावी आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी प्रचारात झंझावात निर्माण केला असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि जनसंपर्कामुळे विजयाची आशा अधिक बळावली आहे. शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments