पोलीस असल्याची बतावणी करत प्रवाशाला एक लाख 58 हजार रुपयांचा गंडा;नळदुर्ग–सोलापूर रोडवरील घटना -Dharashiv Crime News Marathi
धाराशिव – नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत बनावट पोलिस असल्याचे सांगून दोन अज्ञात इसमांनी १ लाख ५८ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे भा.न्या. सं. कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना कशी घडली?
फिर्यादी संजय श्रीमंत कोकणे (वय ५०, रा. आष्टा कासार, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता ते एनएच ६५ मार्गावर नळदुर्ग–सोलापूर रोडवर इटकळ गावाच्या पुढे ‘महाराष्ट्र रसवंती’ समोर उभे असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याशी संपर्क साधला.
त्या इसमांनी “पुढे लुटमार सुरू आहे, आम्ही पोलीस आहोत. तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून खिशात ठेवा,” असे सांगून विश्वास संपादन केला. फिर्यादींनी अंदाजे १० ग्रॅम वजनाच्या, एकूण १,५८,००० रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या काढून दिल्या. आरोपींनी त्या अंगठ्या कागदात बांधून खिशात ठेवल्यासारखे भासवले; मात्र प्रत्यक्षात खोट्या अंगठ्या ठेवून मूळ अंगठ्या लंपास केल्या.
ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रथम खबर दिली. त्यावरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

0 Comments