मौजे केशेगावात शिवतेजाची दिमाखदार उधळण , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भव्य सामाजिक उपक्रम.Keshgaon Shiv Jayanti Celebration

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे केशेगावात शिवतेजाची दिमाखदार उधळण , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भव्य सामाजिक उपक्रम.Keshgaon Shiv Jayanti Celebration

मौजे केशेगावात शिवतेजाची दिमाखदार उधळण ,

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भव्य सामाजिक उपक्रम.Keshgaon Shiv Jayanti Celebration


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

 भव्य रक्तदान शिबिर – ३० युवकांचे रक्तदान.मोफत आरोग्य तपासणी – ३०० ग्रामस्थांचा लाभ.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

शिवभक्त मुरलीधर शिनगारे यांच्या निवासस्थानी जल्लोषात शिव जन्मोत्सव साजरा.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथे हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६ वा जन्मोत्सव अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हा प्रेरणादायी सोहळा शिवभक्त मुरलीधर शिनगारे यांच्या निवासस्थानी गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पार पडला.शिवप्रेमातून पाच वर्षांपूर्वी शिनगारे परिवाराने आपल्या घराच्या परिसरात राजे शिवछत्रपतींचा अश्वारूढ भव्य पुतळा उभारला असून, तेव्हापासून दरवर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

अश्वारूढ पुतळ्याचे विधीवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजन्मोत्सवानिमित्त पाळणा गीत सादर करण्यात आले. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि वातावरण शिवमय झाले.


 रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

यावेळी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे ३० युवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड सेंटर यांच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. युवकांच्या या सहभागामुळे सामाजिक एकतेचे आणि मानवतेचे दर्शन घडले.सलगरा दिवटी येथील पाटील हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जवळपास ३०० ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. डॉ. सचिन पाटील यांनी अत्यंत काळजीपूर्वक आरोग्य तपासणी केली.कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित शिवप्रेमींना शिनगारे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या सोहळ्यास शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख राज अहमद पठाण, सामाजिक कार्यकर्ते कचरू भाऊ सगट, सरपंच मल्लिनाथ गावडे, उपसरपंच मल्लिनाथ महाबोले, माजी उपसरपंच लक्ष्मण क्षीरसागर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संगमेश्वर जळकोट, मेजर भालचंद्र कोळी, मेजर रामचंद्र साखरे, पत्रकार दिनेश सलगरे यांच्यासह गाव परिसरातील बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

 शिवजयंती केवळ उत्सव नाही, तर सामाजिक बांधिलकीची प्रेरणा आहे, हे मौजे केशेगावने पुन्हा एकदा दाखवून दिले. हा ३९६ वा शिवजन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवभक्त मुरलीधर शिनगारे व त्यांच्या परिवाराने अथक परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments