उमरगा तालुक्यातील सीमा वरती दुर्गम भागात 73 लाखाचा गांजा जप्त- पाच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स व उमरगा पोलिसांची संयुक्त मोहीम-Umerga Police and Tas force

Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरगा तालुक्यातील सीमा वरती दुर्गम भागात 73 लाखाचा गांजा जप्त- पाच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स व उमरगा पोलिसांची संयुक्त मोहीम-Umerga Police and Tas force









उमरगा तालुक्यातील सीमा वरती दुर्गम भागात 73 लाखाचा गांजा जप्त- पाच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स व उमरगा पोलिसांची संयुक्त मोहीम-Umerga Police and Tas force

 धाराशिव : मागील वर्षी एमडी ड्रग्जमुळे राज्यभरात चर्चेत आलेला धाराशिव जिल्हा मागील आठवड्यापासून गांजा लागवडीवर होत असलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे स्थानिक पोलिसांनी केलेल्या चार सलग कारवाईचा अद्याप तपासी सुरू झालेला नसताना सोमवार दिनांक 16 रोजी थेट छत्रपती संभाजीनगर येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यांनी उमरगा तालुक्यातील धाकटेवाडी शिवारात 9 ठिकाणी छापी टाकत तब्बल 73 लाख 13 हजार 500 रुपयाचा १४६.27 किलोग्रॅम गांजाची झाडे जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई टास्क फोर्सच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला धाराशिव जिल्ह्यातील धाकटेवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील ,एएसआय शिंदे ,यांच्या नेतृत्वाखाली दोन वाहनातून अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक सोमवार दिनांक 16 रोजी भल्या पहाटे उमरगा येथे दाखल झाले स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करून येथील कर्मचाऱ्यांना सोबत घेत या चार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार धाकटेवाडी शिवारात तपास  सुरू केला.


त्यांना प्रथम गाव शिवारातील तलावा जवळील क्षेत्रात अर्धा एकर वर्गाची लागवड केल्याची आढळून आले परंतु तलावासाठी संपादित असल्याचे समोर आले त्यानंतर परिसरात आणखी शोध मोहीम राबवली असता धाकडेवाडी शिवारातीलच शेवंताबाई मारुती कानडे ,सुग्रीम मारुती कानडे ,जयश्री बाबू भोसले ,विमलबाई पिराजी गोखले ,बालाजी मारुती कानडे यांच्या नावे असलेल्या सामायिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गांजा सदृश्य झाडाची लागवड केल्याची आढळून आली .या झाडाचे नमुने घेऊन धाराशिव इथून बोलवलेल्या फॉरेन्सिक लॅब मध्ये याची तपासणी केली असता ही झाडे व त्यावरील फुले ही गांजा या अमली पदार्थाची असल्याची समोर आली त्यानुसार सरकारी पंचासह तलाठी पोलीस पाटील यांच्या समक्ष पंचनामा करून सदरील झाडे जप्त करून वजन केले असता एकूण 146.27 किलो इतकी वजनाची आमटी पदार्थ आढळून आला.

या गांजाची बाजारातील एकूण किंमत 73 लाख 13 हजार 500 रुपये इतकी आहे याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती .थेट छत्रपती संभाजीनगर येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने सव्वा तीनशे किलोमीटर वरील धाकटे वाडी येथे येऊन केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 मागील अनेक वर्षात उमरगा मार्गे गांजा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात धाराशिव, बीड, लातूर अहिल्यानगर सोलापूर आधी जिल्ह्यात दाखल झाला होता .या प्रकरणी अनेक कारवाई या झालेल्या असून गांजा गुटख्याच्या तस्करीचा प्रमुख मार्ग व केंद्र म्हणून उमरगा तालुक्यास ओळखले जाते परंतु याच तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आल्याने ही केवळ तस्करीचे नव्हे तर उत्पादनाची ही केंद्र असल्याची समोर येत आहे.

Post a Comment

0 Comments