सोलापुरात भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन तरुणाचा जागीच मृत्यू रूपाभवानी चौकातील घटना शिवजयंतीसाठी सोलापुरात आले होते एकत्र-Solapur Accident News Update

Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन तरुणाचा जागीच मृत्यू रूपाभवानी चौकातील घटना शिवजयंतीसाठी सोलापुरात आले होते एकत्र-Solapur Accident News Update

सोलापुरात भीषण अपघात!  अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन तरुणाचा जागीच मृत्यू रूपाभवानी चौकातील घटना शिवजयंतीसाठी सोलापुरात आले होते एकत्र-Solapur Accident News Update 


सोलापूर : सोलापूर शहरात सोमवारी पहाटे सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकीत तीन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला रुपा भवानी  चौकात जोडभावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला हे तिघे तरुण दुचाकीवरून घरी जात असल्याची माहिती समोर आली नागेश प्रकाश गवंडी वय 27 राहणार (रविवार पेठ सोलापूर ) रोहन अशोक कोरे वय 23 राहणार (श्रीशैल नगर भवानी पेठ सोलापूर )आणि प्रज्वल सुनील शेट्टी वय 25 राहणार (शेळगी सोलापूर )अशी मयत झालेल्या तीन तरुणांची नावे आहेत.

हे तिघेही एकमेकांचे जिवलग मित्र होते Mh-१३ इआर 06 27 या दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली व वाहन चालक  वाहनासह फरार झाला .रूपा भवानी मंदिराज जवळील सिद्धेश्वर वुमेन कॉलेज समोरील रस्त्यावर हा भीषण अपघात घडला मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले त्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले नागेश गवंडी यांच्या मोबाईल वरून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता तिघांना शासकीय रुग्णालयात आणण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलीस प्रशासन परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपघाताची माहिती संकलित करीत आहेत पाहणी करत आहेत या अपघातात ठार झालेल्या नागेश प्रकाश गवंडी हा फलटण येथे टोलनाक्यावर काम करत होता त्याच्या वडीलाचे चार महिन्यापूर्वी निधन झाले होते यापूर्वी तो मार्केट यार्ड्यात काम करत होता गेल्या चार महिन्यापूर्वी तो कामाला गेला होता भाऊ-बहीण आणि आईसर तो राहत होता. तर दुसरा तरुण रोहन कोरे हा आई-वडील आणि मोठ्या भावा सुमित राहत होता बजाज फायनान्स पुणे येथे तो काम करत होता त्याला एक विवाहित बहीण आहे तर तिसरा प्रज्वल चनशेट्टी  हा बचत गटाची कामे करत होता 19 तारखेला शिवजयंती असल्यामुळे तिघेही सोलापुरात आल्याची त्यांच्या काही मित्रांनी सांगितले.

शिवजयंती साठी सोलापुरात आले होते तिघे मिञ 

या घटनेत मरण पावलेल्या तिघा तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात तेही घरातील करते होते शिवजयंतीसाठी ते शहरात आले होते या घटनेने या तिघांच्या कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे शासकीय रुग्णालयात तसेच जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू अशी नोंद झाली आहे.

नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

या घटनेत जबाबदार असलेल्या वाहन चालकावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेत नाही असा पवित्रा तिघा मृताच्या नातेवाईकांनी घेतला होता या अपघात प्रकरणी नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे दुपारी पोलिसांनी या प्रकरणाची जो दोषी असेल त्याच्यावर निश्चित गुन्हा दाखल होईल पोलीस सर्वत्र शोध घेत असल्याचे सांगितले आणि नातेवाईकांनी दुपारून  मृतदेह ताब्यात घेतली.

फॉरेन्सिक लॅब घटनास्थळी

जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांनी फॉरेन्सिक ॲम्बुलन्स घटनास्थळी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली दुर्दैवाने ज्या महाविद्यालयासमोर अपघात घडला त्या महाविद्यालयासमोरची सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती पुढे आली आह.

Post a Comment

0 Comments