तुळजापूर : तीर्थ बुद्रुक येथे हॉटेल फोडून १ लाखांचा ऐवज लंपास -Robbery Crime News Tuljapur

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : तीर्थ बुद्रुक येथे हॉटेल फोडून १ लाखांचा ऐवज लंपास -Robbery Crime News Tuljapur

तुळजापूर : तीर्थ बुद्रुक येथे  हॉटेल फोडून १ लाखांचा ऐवज लंपास -Robbery Crime News Tuljapu


तुळजापूर (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटर तोडून रोख रक्कम व साहित्य असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आप्पाराव बिरु धर्मसाले (वय ३७ वर्षे, रा. तीर्थ बु., ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे तीर्थ बुद्रुक गावात ‘इंद्रकृष्ण’ नावाचे हॉटेल आहे. दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.०० वाजण्याच्या सुमारास त्यांनी हॉटेल बंद करून घरी गेले होते. दरम्यान दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी हॉटेलमधील सुमारे १,००,००० रुपयांची रोख रक्कम, एक मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण १,०५,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी हॉटेल उघडण्यासाठी गेल्यानंतर शटरचे कुलूप तुटलेले दिसून आल्याने ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणी फिर्यादी आप्पाराव धर्मसाले यांनी दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३३१(१), ३०५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत; या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



Post a Comment

0 Comments