सोलापूर :बोरामणी नाका येथे भिषण अपघात ! ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू-Solapur Boramani Naka Accident News
सोलापूर | प्रतिनिधी :सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे शुक्रवारी (दि. २७ मार्च २०२६) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जिवलग मित्रांचा (Two friends Accident)जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांची नावे सैफन शेखफरीद पटेल (वय ४०) आणि हुजूर अलाउद्दीन पटेल (वय ३६) अशी असून, दोघेही बोरामणी(Boramani) (ता. दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी होते. दोघे मित्र मिळून स्वयंपाकाचा व्यवसाय करत होते. एका कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूर (south solapur) तालुक्यातील गुंजेवाडी येथे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोरामणी नाका परिसरातील जुन्या चौकात सिग्नलजवळ वळण घेत असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद(CCTV camera) झाली आहे.
अपघातानंतर दोघांना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सैफन पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, पाच बहिणी, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. तर हुजूर पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात (Hospital)मोठी गर्दी केली. संपूर्ण बोरामणी गावावर शोककळा पसरली आहे.
नागरिकांचा संताप उफाळला
या अपघातानंतर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत,
“अजून किती जणांचा बळी जाणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही जड वाहन चालक बेफिकीरपणे व वेगात वाहन चालवतात, तसेच मोठ्या आवाजात गाणी लावत असल्याने इशारे ऐकू येत नाहीत आणि अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे जड वाहनांवर नियंत्रण आणावे व शहरात निर्बंध लागू करावेत, अशी मागणी होत आहे.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून, संबंधित ट्रक चालकाविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.बोरामणी नाका येथील या हृदयद्रावक अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनवला आहे.

0 Comments