पत्नीचा चाकूने खुन करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल- नळदृग येथे चहाच्या टपरीवर केला होता खून-Dharashiv Session Court Judgement
धाराशिव : चारित्र्यावर संशय घेऊन सतत पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देत भांडण करणाऱ्या पतीने याच कारणावरून पत्नीस चाकू व कात्रीने वार करत ठार मारल्याची घटना दिनांक पाच नोव्हेंबर 2024 रोजी घडली होती या प्रकरणी न्यायालयाने आरोपी पती वाहिद बिलाल कुरेशी यास जन्मठेपेची शिक्षा व 30000 रुपयाचा दंड ठोठावला आहे.
या घटनेबाबत जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील मृत महिला सुलताना व तिचा पति वाहिद बिलाल कुरेशी हे दोघेही नळदुर्ग येथे राहत असत. यातील सुलताना हीची नळदृग च्या सरकारी दवाखान्यासमोर चहाची टपरी होती. तिचा पति वाहिद कुरेशी हा सतत पत्नी सुलताना हिच्या चारित्रावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालत मारहाण करत असे .याच कारणावरून घटनेपूर्वी काही दिवस सुलताना मोठी बहीण रजिया बेगम हिच्याकडे हैदराबादला गेली होती त्यानंतर नातेवाईकांनी सुलताना व वाहिद या दोघांना समजावत पुन्हा नळदुर्गला पाठवले होते.
दरम्यान 5 नोव्हेंबर 2024 रोजी वाहिद व सुलताना या दोघा नवरा बायको मध्ये चहाच्या टपरीवर वाद होऊन प्रकरण वाढले सदरचा हा प्रकार पाहत असलेला फिर्यादी खलील शेख यांचा छोट्या मुलांनी हा प्रकार घरी जाऊन वडिलांना सांगितला. त्यानुसार फिर्यादी खलील चहाच्या ज्या टपरीकडे गेले असता आरोपी वाहीद हा एका हातात चाकू व दुसऱ्या हातात कात्री घेऊन पत्नी सुलतानास मारहाण करत होता .यामध्ये जखमी सुलताना जमिनीवर कोसळली होती त्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करून घेतले होते .यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सुलतानाचा जागेवरच मृत्यू झाला तर गंभीर जखमी वहीत या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी फिर्यादी खलील हुसेन शेख वय (32) राहणार अणदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदृग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तपासांती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके यांनी आरोपी वाहिद बिलाल कुरेश यांचे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले सदर प्रकरणाच्या सुनावणी सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय अभियोग्यता महेंद्र बी देशमुख यांनी बाजू मांडताना 12 साक्षीदार तपासले. सदर प्रकरणांमध्ये बालसाक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
त्यानुसार समोर आलेले साक्षी ,पुरावे व एडवोकेट महेंद्र देशमुख यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी आरोपी वाहिद बिलाल कुरेशी यास दोषी ग्राह्य धरून जन्मठेप व 30 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा दिनांक 25 मार्च 2026 रोजी सुनावली आहे सदर प्रकरणात कोर्ट भैरवी म्हणून पोलीस अंमलदार संजय जटे यांनी काम पाहिले.

0 Comments