मुंबई: मुन्नाभाई डॉक्टरांच्या मुसक्या आवळणार; सरकार विशेष टास्क फोर्स स्थापन करणार-Task Force Commite News

Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई: मुन्नाभाई डॉक्टरांच्या मुसक्या आवळणार; सरकार विशेष टास्क फोर्स स्थापन करणार-Task Force Commite News

मुंबई: मुन्नाभाई डॉक्टरांच्या मुसक्या आवळणार; सरकार विशेष टास्क फोर्स स्थापन करणार-Task Force Commite News 


मुंबई प्रतिनिधी : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या सुस्वार्थावर आणि अनधिकृत नरसिंग होम वर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच विशेष टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. सध्याच्या कायद्यातील केवळ 50 रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद अपुरी असल्याने गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी नवे कडक धोरण आणले जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

मुंबई सह संपूर्ण राज्यात विनानोंदणी सुरू असलेल्या रुग्णालयामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा मुद्दा भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केला होता. दहावी पास व्यक्ति ही डॉक्टर म्हणून काम करत असल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी मांडले यावर उत्तर देताना मंत्री सावंत यांनी सांगितले की नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवामार्फत या टास्क फोर्स चे नेतृत्व केले जाईल. या समितीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव विभागीय आयुक्त आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञाचा समावेश असेल ही समिती पुढील अधिवेशनापर्यंत आपला अहवाल सादर करील काँग्रेसचे भाई जगताप आणि सचिन अहिर यांनी या विषयाचे गांभीर्य लढत लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

अशी होणार कडक कारवाई

महाराष्ट्र सुरक्षा नोंदणी अधिनियम 1949 नुसार सध्या तपासणी केली जात असून मुंबईत 1371 नोंदणी क्रत नर्सिंग होम आहेत .गोंडी घाटकोपर आणि कुर्ला परिसरातील 35 अनधिकृत नर्सिंग होमवोर महापालिकेने यापूर्वीच कारवाई केली आहे .यापुढे बोगस डॉक्टरांची ऑनलाइन यादी प्रसिद्ध करण्यासोबतच तक्रारींसाठी विशेष हेल्पलाइन आणि मोबाईल ॲप सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे सर्व पोलीस ठाण्यांना अनधिकृत रुग्णालयाची माहिती देऊन थेट दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Post a Comment

0 Comments