Dharashiv leopard news| भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली; ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाचा सतर्कतेचा इशारा,

Hot Posts

6/recent/ticker-posts

Dharashiv leopard news| भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली; ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाचा सतर्कतेचा इशारा,

भूम तालुक्यात बिबट्याची दहशत; गाईची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद , ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण- वन विभागाकडून सतर्क राहण्याचे आव्हान


धाराशिव  : भुम तालुक्यात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामेश्वर शिवारात बिबट्यासदृश प्राण्याने शेळीला पकडल्याची घटना ताजी असतानाच आता वारेवडगाव परिसरात गाईवर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी ७ वाजून १० सेकंदांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या स्पष्टपणे कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. या बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

ही घटना वारेवडगाव येथील शेतकरी बाळासाहेब नलवडे यांच्या शेतात घडली. त्यांच्या गोठ्यातील गाईवर बिबट्याने हल्ला केल्याने गाईचा मृत्यू झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गाईवर हल्ला करण्यासाठी येताना बिबट्या शेतकऱ्यांनी व वनविभागाच्या मदतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाला तात्काळ कळविण्यात आले. त्यानंतर वन अधिकारी कुटे, वनपाल जाधवर, जगताप व देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाची विशेष टीम कार्यरत झाली असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, सलग घडणाऱ्या या घटनांमुळे भूम तालुक्यासह आसपासच्या गावांतील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून होत आहे.

वनविभागाचे नागरिकांना आवाहन

या पार्श्वभूमीवर वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • रात्रीच्या वेळी शेतात किंवा घराबाहेर एकटे जाऊ नये

  • जनावरे सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी बांधावीत

  • लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे

  • परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा

सतर्क रहा, सुरक्षित रहा,” असा संदेश वनविभागाच्या वतीने देण्यात आला असून बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची मोहीम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments