धाराशिव–सोलापूर येथील १०० रामभक्तांची अयोध्या यात्रा भावपूर्ण वातावरणात संपन्न.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*अयोध्या येथील राम मंदिर व रामलल्ला दर्शनाने रामभक्त भारावले तर शरयू स्नानाने यात्रेला पावित्र्याची जोड.*
"""""'''""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (प्रतिनिधी): धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १०० रामभक्तांनी मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी पवित्र अयोध्या नगरीत श्रीराम लल्लाचे दर्शन घेत भक्तिमय वातावरणाचा अद्वितीय अनुभव घेतला. या यात्रेचे नियोजन हभप. दत्तात्रय क्षिरसागर महाराज आणि रामभक्त नागनाथ स्वामी यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले होते.
धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांतील ५५ महिला व ४५ पुरुष, असे एकूण १०० भाविक सहभागी त्यामध्ये ऊळे, रान मसाला, कंदलगाव, तामलवाडी, कोंडी, इटकळ, सोलापूर, अक्कलकोट आदी भागांतील राम भक्तांचा सहभाग.दि. ९ एप्रिल रोजी ऊळे येथून यात्रेला प्रारंभ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत आयोध्येकडे आगमन.यात्रेदरम्यान भाविकांनी अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट दिली त्यामध्ये वैजनाथ मंदिर परळी, औंढा नागनाथ मंदिर ,चित्रकूट सती अनुसया आश्रम ,गुप्त गोदावरी, सीता मढी , काशी विश्वनाथ दर्शन घेऊन अयोध्या येथे दाखल.शरयू स्नान आणि जयघोषाने दुमदुमले वातावरण.अयोध्येत आगमनानंतर सकाळी ७ वाजता सर्व रामभक्तांनी पवित्र शरयू नदी येथे स्नान केले.
“जय श्रीराम, जय सीताराम” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवास आली.
रामलल्ला दर्शनाचा अविस्मरणीय क्षण.अयोध्या येथील भव्य राम मंदिर पाहताच भाविकांचा आनंद ओसंडून वाहू लागला.मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच अनेक भाविक भावूक झालेरामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन घेताना प्रत्येकजण मंत्रमुग्ध झाला
“न भूतो न भविष्यती” असा भव्य दिव्य अनुभव सर्वांनी व्यक्त केला
यावेळी रामभक्तांनी सांगितले की:
“जन्माचे सार्थक झाले”
“याच देही, याच डोळा प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी पाहण्याचा योग लाभला” यावेळी राम भक्तांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले
या यात्रेचे उत्कृष्ट नियोजन
हभप. दत्तात्रय क्षिरसागर महाराज
नागनाथ स्वामी (कृष्णा ट्रॅव्हल्स)
यांचे सर्व रामभक्तांनी मनापासून आभार मानले.ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर आध्यात्मिक समाधान देणारी, एकात्मतेची भावना वाढवणारी आणि आयुष्यभर लक्षात राहणारी ठरली. अयोध्येतील रामलल्ला दर्शनाचा हा सुवर्णक्षण सर्व रामभक्तांच्या मनात कायमचा कोरला गेला.


0 Comments