धक्कादायक घटना :भुम शहरात भरदिवसा पोस्ट ऑफिससमोरून व्यक्तीचे अपहरण; अज्ञात महिला व तिघांविरुद्ध गुन्हा दाखल-Kindap News Dharashiv District
![]() |
| प्रतिकात्मक फोटो |
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शितल शिवाजी ओगले (वय ३९, रा. कुसुम नगर, भुम) यांनी भुम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचे पती शिवाजी मालोजी ओगले (वय ५४) हे दि. २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२३ वाजण्याच्या सुमारास भुम येथील पोस्ट ऑफिससमोर उभे असताना, एक अनोळखी महिला व तिच्यासोबत असलेल्या तीन इसमांनी त्यांना विनाकारण अडवून मारहाण केली.
यानंतर आरोपींनी शिवाजी ओगले यांना जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या ईको कंपनीच्या चारचाकी गाडीमध्ये (क्रमांक एमएच १६ सीव्ही १६९७) टाकून अज्ञात ठिकाणी घेऊन जात अपहरण केले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४०(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, अपहरणामागील कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून अपहृत व्यक्तीची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.

0 Comments