तुळजापूर : गुळहळी येथे समाईक भिंतीच्या वादातून तलवार, हंटर व काठीने हल्ला; एक गंभीर जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल- Tuljapur Crime News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : गुळहळी येथे समाईक भिंतीच्या वादातून तलवार, हंटर व काठीने हल्ला; एक गंभीर जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल- Tuljapur Crime News Live

तुळजापूर : गुळहळी येथे समाईक भिंतीच्या वादातून तलवार, हंटर व काठीने हल्ला; एक गंभीर जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल- Tuljapur Crime News Live

तुळजापू : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील गुळहळी येथे समाईक भिंतीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर तलवार, हंटर आणि काठीने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केशव आण्णाप्पा हलकंबे (वय ४८, रा. गुळहळी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना दि. १४ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास गुळहळी येथे घडली.

याप्रकरणी दत्ता काळुंके, अंकुश दत्ता काळुंके व सुमीत अंकुश काळुंके (सर्व रा. गुळहळी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, समाईक भिंतीच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच तलवार, हंटर आणि काठीचा वापर करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीदेखील दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर जखमी व्यक्तीने नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९, ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments