सिंदफळ येथे 'हिट अँड रन'ची धडक जीवघेणी; तीन महिन्यांनंतर अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल-Hit And Run Tuljapur Accident News

Hot Posts

तुळजापूर, दि. 10 जुलै : तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तब्बल तीन महिन्यांनंतर तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करमोद्दीन गणी शेख (वय 43, रा. तीर्थ खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हे दि. 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास सिंदफळ येथील हॉटेल चंद्रलोकसमोरून पायी जात होते. यावेळी अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून करमोद्दीन शेख यांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात करमोद्दीन शेख गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मयताचे भाऊ शाबुद्दीन गणी शेख (वय 36, रा. तीर्थ खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दि. 9 जुलै 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 106, 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 184 व 134(अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून अज्ञात वाहन व चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत

Post a Comment

0 Comments