/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> मौजे केरूर येथील खंडेराव अप्पाराव सुरवसे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Hot Posts

मौजे केरूर येथील खंडेराव अप्पाराव सुरवसे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

मौजे केरूर येथील खंडेराव अप्पाराव सुरवसे यांना पीएच.डी. पदवी प्रदान


-----------------------------------

गणपराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान’ या विषयावर संशोधन; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव.

---------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे केरूर येथील खंडेराव अप्पाराव सुरवसे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त झाली आहे. त्यांच्या या यशामुळे केरूर गावासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुरवसे यांनी ‘गणपराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान’ या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन करून आपला शोधप्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता. या संशोधनामध्ये त्यांनी गणपराव देशमुख यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा सखोल अभ्यास व विश्लेषण केले आहे.सदर संशोधन कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड येथील संशोधन केंद्रातून पूर्ण झाले. या संशोधनासाठी त्यांना डॉ. ज्ञानोबा ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल मौखिक परीक्षेचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, संशोधन मार्गदर्शक डॉ. ज्ञानोबा ढोबळे, संशोधन केंद्राचे प्राचार्य डॉ. शिवदास सिरसाठ, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश लोखंडे, तसेच कुटुंबीय, मित्रपरिवार, मधुशाली महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतकांनी खंडेराव सुरवसे यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ग्रामीण भागातून येऊन संशोधन क्षेत्रात मिळवलेले हे यश निश्चितच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या या यशाचे गाव परिसरातून अभिनंदन करीत कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>