धाराशिव : निजाम राजवटीतील उस्मानाबाद हे नाव रद्द करून सुरुवातीस उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव नामकरण करण्याबाबत केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे, अखेर आज महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध करून संपूर्ण जिल्हाचे नामकरण धाराशिव करण्यात आले आहे. शासनाचे उपसचिव संतोष गावडे यांनी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ऐतिहासिक नोंद केली आहे. उस्मानाबादचे धाराशिव करण्यासाठी येथील जनतेची अडीच दशकापासून मागणी होती. त्यामुळे धाराशिवकरांची ही ऐतिहासिक स्वप्नपूर्ती झाली आहे,या निर्णयाचे जिल्हावासियाकडुन सर्वत्र स्वागत होत आहे. उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची घोषणा सर्वात आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, आता तब्बल अडीच दशकांनंतर उस्मानाबादचे नामांतरण धाराशिव करण्यात आले आहे. याला केंद्राची परवानगीही मिळाली आहे. शिवसेना, भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी यासाठी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा व आंदोलनेही केली होती, अखेर या लढ्याला दि,२४ रोजी यश आले आहे. अखेर धाराशिवरांची ऐतिहासिक स्वप्नपूर्ती झाली असून केंद्रातील व राज्यातील सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
0 Comments