लॉजवर नेऊन विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल-Dharashiv Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

लॉजवर नेऊन विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल-Dharashiv Crime

लॉजवर नेऊन विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल-Dharashiv Crime 

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय विवाहित महिलेवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तुळजापूर तालुक्यातील  एका गावातील ३० वर्षीय महिला (नाव व गाव गोपनीय) हिच्यावर दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने फसवणूक करून तिला लॉजवर नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेने दि. ५ मार्च २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ७९ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1)(डब्ल्यु)(i)(ii) आणि 3(2)(व्ही) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments