Hot Posts

6/recent/ticker-posts

येवती येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाची भव्य मिरवणुकीने सांगता


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील येवती येथील  सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम संपन्न करून दि,२८ रोजी गावातून भव्य मिरवणूक काढून सांगता करण्यात आली. येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने दि,१९ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ह .भ. प  सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन, सर्वरोग निदान शिबिर, वकृत्व स्पर्धा, बालकांचे आधार कॅम्प, ह. भ. प भागवताचार्य रुपाली परतुनकर  यांचे कीर्तन आदी कार्यक्रम घेण्यात आले. शिवजन्मोत्सवाची पालखी सोहळा करून भव्य अशी गावामधून मिरवणूक काढण्यात आली . यावेळी गावातील ग्रामस्थ, तरुण ,शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होत.





बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
राजगुरु साखरे मो.९८८१२९८९४६

Post a Comment

0 Comments