रामराजे बारकुल(मयत)
धाराशिव :कळंब तालुक्यातील येरमाळा येथे गुरुवारी दि,२ मार्च रोजी पहाटे पाच वाजता धक्कादाय घटना घडली आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा येथे मानसिक, कौटुंबिक त्रासाला कंटाळेल्या बापाने मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना येरमाळा शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की येरमाळा येथील सतीश महादेव बारकूल (वय ५५ वर्षे) यांचा मुलगा रामराजे सतिश बारकुल (वय २३ वर्षे) हा सतत मानसिक व कौटुंबिक त्रास देत होता. बुधवारी रात्री तो दारू पिऊन घरी आल्यावर बाप-लेकामध्ये भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून मुलगा रामराजे याने वडिलांसह आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
जन्मदात्या पित्यानेच घातला मुलाच्या डोक्यात झोपेत असताना दगड
हे भांडण झाल्यानंतर रामराजे हा शेतात निघून गेला. रामराजे याचे वडील सतीश हे रोजच्या भांडणामुळे वैतागून गेले होते. यामुळे त्यांनी रामराजे यास जीवे मारण्याचे मनात ठरवले. त्यांचा मुलगा रामराजे हा कळंब – येरमाळा रोडवरील शेतातील असणाऱ्या गोठ्यामध्ये झोपला होता. सतीश यांनी गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ च्या सुमारास तेथे जात झोपेत असलेल्या मुलाच्या डोक्यात दगड घातला. या हल्ल्यात रामराजे याचा जागीच मृत्यू झाला.पित्याने मुलाला मारले हे कोणालाही माहिती नव्हते. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सतीश बारकूल यांनी त्यांचा लहान भाऊ लालासाहेब महादेव बारकूल यास आपण मुलाचा खून केल्याचे सांगितले. हे ऐकून मुलाचा चुलता लालासाहेब बारकूल यांना धक्काच बसला. लालासाहेब यांच्या फिर्यादीवरुन येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये कलम ३०२ अंतर्गत सतीश बारकूल यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बापानेच मुलाचा खून केल्यामुळे कळंब तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून सर्वत्र या घटनेची चर्चा होत आहे.
0 Comments