Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा ,१३ ते १५ मार्च विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज


मुबंई : महाराष्ट्रातील वातावरणात गेल्या महिन्यांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यात कडक उन्हाच्या झळा बसत होत्या तर मार्च महिन्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने  वर्तवली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, १३ते १५मार्च दरम्यान विजेच्या कडकडाटसह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे टाकले आहे. त्याचबरोबर मुंबई ,ठाणे ,रायगड आणि रत्नागिरी मध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments