तुळजापूर - तालुक्यातील देवसिंगा तुळ येथील स्वस्त धान्य दुकानदार तथा युवा नेते श्री. उल्हास मुरलीधर जाधव यांची आखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारक महासंघाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून दि.05 मार्च रोजी केली असून इतर तालुका पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्याचे पत्र महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. पुष्कराज काका देशमुख यांनी दिले आहे, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी शिवाजीराव जाधव, सचिव पदी शिवाजीराव सुपणार, सहसचिव पदी दाजी माने, कोषाध्यक्ष पदी जितेंद्र सरडे, संघटक पदी हरी घाटशिळे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून मुरलीधर करंडे, समन्वयक म्हणून ए. आर. जहागीरदार, कार्याध्यक्ष पदी किशोर हंगरगेकर तर कार्यकारणी सदस्यपदी बाळासाहेब दरेकर आणि नितीन पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे, या निवडी बद्दल तुळजापूर तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
0 Comments