तुळजापुर तालुक्यातील काटी येथे शाळा पुर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात संपन्न !
===================
तुळजापुर: तालुक्यातील काटी येथे केंद्रस्तरीय शाळा पुर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याचे उदघाटन शिक्षणविस्ताराधिकारी अर्जुन जाधव यांनी फित कापुन केले.यावेळी केंद्रप्रमुख संजय सोलंकर ,प्राथमिक शाळा काटीचे मुख्याध्यापक सत्यवान रसाळ आणि प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी राठोड,केंद्रिय कन्या काटीचे मुख्याध्यापक शेख हे पण उपस्थित होते.शालेय परिसरात फेरी काढुन प्रबोधन करण्यात आले.कार्यकमस्थळी सुंदर रांगोळी काढण्यात आली होती.केंद्रातुन आलेल्या सर्व शिक्षक,पदवीधर शिक्षक,मुख्याध्यापक ,अंगणवाडी सेविका,मदतनिस ,विद्यार्थी यांना मार्गदर्शन तंत्रस्नेही शिक्षक श्री.विठ्ठल निचळ यांनी केले.मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळा काटी व प्रशाला काटी यांनी मेहनत घेतली.प्रशाला काटी व प्राथमिक शाळा काटी यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.भाषीक,बौध्दीक ,मानसिक,सामाजिक विकासाचे सजावट केलेले टेबल मांडणी करण्यात आले होते.नावनोंदणी,मार्गदर्शन,उदबोधन कक्षाची निर्मिती करण्यात आली होती.या मेळाव्यासाठी चहा व अल्पोहाराची सोय सहशिक्षक श्री.पंकज काटकर यांनी केली.पिण्याचे थंड पाणी,चहा,अल्पोहार,स्वागत,स्वागत गीत यामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.शाळा पुर्वतयारी अभियानाची उत्साहात सांगता झाली.
0 Comments