Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवकन्या बिराजदार विजयी

चिवरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवकन्या बिराजदार विजयी


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी  येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत थेट सरपंच पदासाठी दि,१८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तर शुक्रवारी दि,१९ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजप पुरस्कृत बळीराजा ग्रामविकास पॅनलच्या शिवकन्या बिराजदार यांनी 1033 मते घेऊन विजयी झाल्या आहेत,तर त्यांच्या  प्रतिस्पर्धीपेक्षा 156 अधिक मते मिळवले आहेत.तर  प्रतिस्पर्धी ग्रामविकास पॅनलच्या सरोजाबाई शिंदे यांना 877 मतावर समाधान मानावे लागले. निकाल जाहीर होतात बळीराजा ग्राम विकास पॅनलच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांसह गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी बळीराजा ग्रामविकास पॅनलच्यावतीने अकाली निधन झालेल्या कै.अतुल राजमाने, कै.अजित सूर्यवंशी,कै. सरोजाबाई बिराजदार, कै. कमलबाई बिराजदार यांना सामुहीक श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी सैनिक विठ्ठल होगाडे, उपसरपंच लक्ष्‍मण लबडे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मेंढापुरे ,पिंटू बिराजदार, युवा नेते सचिन बिराजदार, पोलीस नाईक अमोल मंकराज ,राजेंद्र शिंदे, प्रभाकर बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम देशमुख, नीलकंठ स्वामी, दीपक पाटील ,भीमा देडे, शंकर बिराजदार ,शिवराम बिराजदार,  किसन शिंदे, प्रकाश राजमाने आधी सह ग्रामस्थ उपस्थित होत.


Post a Comment

0 Comments