Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी विभागाच्या बियाणे वाटपाचा लाभ घेण्याचे आवाहन |Department of Agriculture..

कृषी विभागाच्या  बियाणे वाटपाचा लाभ घेण्याचे आवाहन ....                        

         


                                          

धाराशिव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि पोषण अभियान अन्नधान्ये पिके सन २०२३-२४ अंतर्गत खरीप हंगामात तुर,मुग,उडीद,सोयाबीन व बाजरी या पिकांची पिक प्रात्यक्षिके तसेच 10 वर्षाच्या आतील वाणांचे  व 10 वर्षावरील वाणांचे  तसेच सोयाबीन पिकाच्या 15 वर्षाआतील वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण कृषी विभाग व महाबीज यांच्या वितरका मार्फत करण्यात येणार आहे.  

       तसेच या योजने अंतर्गत पिक प्रात्यक्षिक, एकात्मिक अन्न द्रव्य  व्यवस्थापन , एकात्मिक किड व्यवस्थापन , पाईप पुरवठा व पंपसंच इत्यादी बाबीचा लाभ दिला जातो या सर्व बाबींचा लाभ घेण्याकरिता ल़ॉटरी पद्धतीने महाडिबिटी पोर्टल मार्फत शेतकऱ्यांची निवड केली जाते या करिता   https: //mahadbtmahait.gov.in अर्ज सादर करावा.  

          जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  रविंद्र माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments