बारूळ येथे ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन !
तुळजापुर: तालुक्यातील बारूळ येथे स्व. शिवलिंग त्रिंबक ठोंबरे यांच्या स्मरणार्थ ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि,१७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील बाळेश्वर विद्यालय, नूतन इमारत बारूळ येथे किर्तन सोहळा होणार आहे. या कीर्तन सोहळ्याचे समस्त ठोंबरे परिवार व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजन करण्यात आले असून या कीर्तन सोहळ्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments