Hot Posts

6/recent/ticker-posts

यशोगाथा अवर्षण प्रवण क्षेत्र विकास (डी.पी.डी.सी ) उपाययोजनांची ! - श्री सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी - नातेपुते| Success story of drought prone area development (DPDC) measures! - Mr. Satish Waste Board Agricultural Officer - Relative

यशोगाथा अवर्षण प्रवण क्षेत्र विकास (डी.पी.डी.सी ) उपाययोजनांची ! - श्री सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी - नातेपुते   


 

नातेपुते/प्रतिनिधि: स्वातंत्त्र्याच्या अमृत महोत्सवात नातेपुते मंडळ कृषि अधिकारी , नातेपुते अधिनस्त लोणंद, लोढे मोहीते वाडी , फडतरी , शिवारवस्ती , निटवेवाडी , कारुंडे, पिपरी ' कोथळे ह्या अवर्षन प्रवन क्षेत्रात पाण्याचे दुर्लभिक्ष , प्रामुख्याने रब्बी हंगाम पीक पद्धत ,पावसाच्या पाण्यावर शेती पीक पद्धती, कोरडवाहू शेती पीक पद्धती,अत्यल्प दरडोई उत्पन यावर जीवनमान अवलंबून आहे . यावर एकात्मिक शेती पद्धती , शाश्वत पाणी व्यवस्थापन , ठिबक सिंचनाचा वापर ,मृद व जलसंधारण उपाययोजना अंतर्गत जमिन सुधारणा कार्यक्रम राबवून पाणी पातळी वाढविणे , पीक पद्धतीत बदल , राहणीमान उचावणे ' दरडोई उत्पन्न वाढविणे काळाची गरज होती, यासाठी एकात्मिक उपाययोजना करणेचे नियोजन , आयोजन , अमंलबजावणी करण्यात आली होती त्याचे दृष्य परिणाम दिसून येत आहेत . 

या एकात्मिक पद्धती मध्ये लोकसहभागातून व शासकिय अनुदानातून अर्थसहाय्यातून उपाय योजना राबविण्यात आल्या . लोक सभागातून होण्यात आलेल्या कामा मध्ये मुळस्थानी जलसंधारण उपाययोजना मध्ये वरील प्रत्येक गावात १ - उताराला आडवी मशागत नागरट, फनणी व पेरणी १०१ हे करण्यात आली २ - जमिनीची धूप थांबविणे साठी पेरणी क्षेत्रात मृत सरी  - १०१ हे वर काढण्यात आली . ३ - रुंद सरी व वरंबा १०१ हे क्षेत्रावर काढण्यात आले . 

४- पट्यपद्धतीने बहूपीक पद्धत बाजरी + सूर्यकुल' बाजरी तूर लागवड १०१ हे क्षेत्रावर करण्यात आली . ५ - १०१ हे क्षेत्रावर बी.बी फ पद्धतीचा अवलंब करण्यात आला . ६ - बाजरी पीकात १०१ हे क्षेत्रावर डॉ उगले तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला . ७- ऑक्टोंबर पर्यत वाहणाऱ्या वड्या व नालेवर प्रति गाव ३ प्रमाणे प्रत्येकी .२५ टीसीएम क्षमतेचे २४ वनराई बंधारे बांधण्यात आले त्याचा 6 ह. घमी पाणीसाठा झाला.पहा आणि विश्वास ठेवा चा अवलंब करण्यात आला व त्याचा मृद व जलसंधारण, जमिनीची धूप कमी करण्यास तसेस शेतातील माती शेतात व शेतातील पाणी शेतात मुलस्थानी जलसंधारण साठी दृष्य परिणामासह रिझल्ट दिसून आला , प्रत्यय आला .


शासकिय अर्थसहाय्य व अनुदानाच्या बाबीमध्ये १ - मुख्यमत्री शाश्वत सिंचन योजना मधून वैयक्तिक शेततळे अर्ज प्रचार प्रसिद्धी प्रसार करून अर्ज भरण्याची मोहीम घेण्यात येऊन मार्च २० २३ अखेर पिपरी येथील १ लाभार्थीला ३४ x३४ x१० मी क्षमतेचे १ .५० कोटी लिटर पाणी क्षमतेचा शेततळे खोदाई २.३० लाख भांडवली खर्चाचे व ७५ हजार अनुदानीत शेततळे खोदाई अनुदान वितरणा सह २ .०० हे क्षेत्राला शाश्वत व सरक्षीत पाणी व्यवस्थापन ची सोय झाली . 

२ - प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना , अटल भुजल योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिचन योजना अंतर्गत या गावातील २१ लाभार्थीना २१ हे क्षेत्रावर ठिंबक सिचन चा वापर करून शाश्वत सरक्षीत पाणी चे काटेकोर व्यवस्थान करण्यात येऊन ५ लाख अनुदानाचा अर्थसहाय्य लामार्थीना देण्यात आले .

 ३ - विविध योजना मधून खोदलेल्या शेततळे साठी पाणी साठवण व संरक्षीत व शाश्वत पाणी व्यवस्थपना  साठी शेततळे अस्तरीकरणास लोणंद -३ , कारुडे -१ , पिपरी -२ शेततळे प्लॅस्टीक अस्तरीकरण साठी ६ लाभार्थीना ४.५० लाख अनुदान वितरीत करण्यात आले . 

४-लोणंद ' लोढेमोहिते वाडी , फडतरी, शिवारवस्ती , निटवेवाडी , कारुडे , पिपरी ' कोथळे येथे जलयुक्त शिवार फेज १ .० , डीपीडीसी , आय डब्लू एम पी क्षेत्र उपचाराची ६०% क्षेत्रावर कामे कंपटिमेन्ट बंडीग , सलग समतल चर, ल्युज बोल्डर , अर्दन स्ट्रक्चर' ही कामे घेण्यात आली आहेत यामुळे ही जमिनीची धूप कमी होऊन मृद व जलसंधारण व मुलस्थानी जलसंधारण झाले आहे . 

५ - संबधीत गावामध्ये नाला उपचाराची म्हणजे माती नालाबांध सिमेंट बांध व दुरुस्तीची कामे घेणेबाबत सन २०२१- २२ मध्ये ग्रामसभेने सुचविलेली तांत्रीक निकषानुसार एकून ४८ कामाचे नियोजन करण्यात आले . 

६ - कोथळे -१०, पिपरी - ६ , कारुडे -६ लोणंद -१८, फडतरी - ७ अश्या एकूण ४६ मातीनालाबांध कामे उपविभागीय कृषि अधिकारी पंढरपूर कार्यालयाने काढलेल्या निविदा अंतर्गत मान्यताप्राप्त ठेकेदार ,मजूर संस्था याचेकडून कार्यरंभ आदेशान्वये मान्यताप्राप्त ' आर्हता धारक ' नोंदणीकृत ठेकेदार यांचेकडून मंजूर निविदा नुसार एकूण ४६ मातीबांधकामे २.०० कोटी भांडवली खर्चाची १.१६ कोटी मध्ये निविदाद्वारे केल्याने शासनाचे ८४ कोटी रुपये वाचले .

 ७ - या माती नालाबांध कामामुळे मृद संधारणासह कोथळे -१० कामे -४३.२२ ह.घ.मी , पिपरी - ६ कामे २२.५९ ह घ.मी , कारुडे - ६ कामे - २१. ८१ ह.घ.मी , लोणंद -१८ कामे ८९.०५ ह.घ.मी व फडतरी -७ कामे ३२ .९८ ह घ मी . जलसंधारणाची एकूण २०९.६२३ ह . घ .मी पाणीसाठा म्हणजे लघू प्रकल्प पाणीसाठा एवढे काम ५ गावात इतर विभाग योजना यांचे तुलना करता सर्वात कमी म्हणजे ५५३३७ रु प्रति ह. घ .मी खर्चाची ही कामे करण्यात आली .


 या सर्व लोकसहभाग व शासकिय अर्थसहाय्य व अनुदानातील डीपीडीसी मृद व जलसंधारण उपाययोजनातून जमिन सुधारणा कार्यक्रम कामाचे उत्कृष्ट असे दृष्य परिणाम दिसून आले त्याचा प्रत्यय खालील बाबीवरून दिसून येत आहे. वरील गावातील विहीरीची सरासरी पाणी पातळी २० मीटर खाली गेलेली ८ मीटर पर्यत मृद व जलसंधारणामुळे वर आली आहे . एकात्मिक मृद व जलसंधारण, मुलस्थानी जलसंधारण, शेततळे पाणी साठवन , ठिबक सिंचन वापर, संरक्षीत पाणी , शाश्वत पाणी सोय मुळे या गावात फळपिक क्षेत्रात वाढ होईन २० हे आंबा , पेरू, सिताफळ ' डाळीब ,डूगन फ्रुट या पिकाची लागवड झाली आहे . मका पिकाचे २२०हे क्षेत्रावर लागवड पेरा झाला होता व या पिकाखालील क्षेत्र वाढ होत आहे .

 हिरवा चारा मुग उडीद या पिकाखालील क्षेत्र वाढ होऊ न बाजरीचे क्षेत्र कमी होत आहे. वरील मृद व जलसंधारण कामे पिकात झालेला पीक बंदल यामुळे ३५० पेक्षा जास्त लोकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत . . शाश्वत, संरक्षीत पाणी , ठिंबक सिंचन वापर यामुळे चारा पिकासह दुग्ध उदयोग ह्या कृषिपुरक उदयोगास चालना मिळाली आहे. या अवर्षन प्रवन क्षेत्रात एकात्मीक पध्दतीने म्हणजे लोकसहभाग ' शासकिय योजना अर्थसहाय्य अनुदान व डीपीडीसी अर्थसहाय्य मृद व जलसंधारण उपाययोजना अंतर्गत जमिनिचा विकास , मुलस्थानी मृद व जलसंधारण , वाढलेली पाणी पातळी ,शाश्वत व संरक्षीत पाणी व्यवस्थापन , ठिबकचा वापर , पीक पद्धती बदल , फळबाग लागवड, कृषि पुरक उदयोग दुग्ध व्यवसाय , रोजगाराची संधी व उपलब्धता यामुळे या क्षेत्रातील लोकांचे कुटूबाचे दरडोई उत्पन्नात वाढ होऊन राहणीमान सुधारणा होऊन सबका साथ सबका विकास झाला आहे . 

या गावातील पंचायत समिती सदस्य , संरपच , पोलीस पाटील , ग्रामपंचायत सदस्य, शेतीमित्र' व लागार्थीचे मौल्यवाण सकारात्मक अभिप्राय व सदेश आन्वये सिद्ध होत आह . १ - श्री माणसिग आप्पा मोहीते - पंचायत समिती सदस्य लोणंद - ठेकेदार मजूर संस्था यांनी कृषि विभाग मदतीने निवीदाआधारे केलेली कामे गुणवत्ता पुरक उत्कृष्ट आहेत व अशी कामे भविष्यात घेणेत यावीत . 

२- श्री अमोल आगम - पोलीस पाटील कोथळे - आतापर्यन केलेल्या कामामध्ये या वर्षी केलेली कामे सर्वाउत्कृष्ट व दर्जेदार आहे अशी कामे घेणेत यावीत . ३ - श्री अविनाश कर्चे -संरपंच -पिपरी - तांत्रीक द्रष्ट्या उत्कृष्ट दर्जेदार कामे समाधानकारक कामे मुळे रोजगार संधी उपलब्ध झाल्या व पाणी पातळी वाढण्यात मदत झाली . ४- अदिनाथ शिवाजी कर्चे - पिपरी - रोजगार मिळाला रोजगार उपलब्ध झाला शेततळे अस्तरीकरणामुळे जलसंधारण शाश्वत व संरक्षीत पाणी मुळे माझे भाजीपाला लागवड वाढ होऊन उदरनिर्वाह साधन निर्माण झाले . 

५ - श्री चंद्रकात गिरजप्पा रुपनवर फडतरी_मानाबा मुळे पाणी पातळी वाढ झाली व डूगनफ्रुट लागवड केली बोअरचे पाणी वाढण्यास मदत झाली . ६ - अनिल आगतराव माने -सदस्य ग्रामपचायत कोथळे - शेळ्यामेंढ्या जनावरे यांचे पाणी पिणेसाठी उपलब्ध झाले . विहीरीची पाणी पातळी वाढली उत्कृष्ट कामे ०.२० हे आंबा व शेवगा लागवड केली . याच बरोबर लोणंद , पिपरी, कोथळे , फडतरी या गावचे विशेष ग्रामसभा घेऊन कृषि विभागाने समाधानकारक उत्कृष्ट कामे केल्याचा व अशीच कामे घेणेबाबत ठराव देऊन कृषि विभागाचे कृतज्ञता व आभार व्यक्त केले आहेत . अशाप्रकारे अवर्षन प्रवन क्षेत्र विकास लोकसहभाग विविध शासकिय योजना अनुदान व डीपीडीसीने अर्थसहाय्याने यशस्वी झाला यात काही तिळमात्र शंका नाही !

Post a Comment

0 Comments